शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जळगाव राज्यात ‘टॉप फाईव्ह’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 11:48 IST

भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जानेवारी महिन्यात जळगाव राज्यात चौथ्या तर नाशिक परिक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे दोष सिध्दीचे प्रमाण ५०.१२ टक्के असून १५ हजार १२३ गुन्ह्यांपैकी ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे. जिल्ह्यांमध्ये नागपूर ग्रामीण प्रथम (७७.७९ टक्के) तर जळगाव जिल्हा चौथ्या (६५.१२ टक्के) क्रमांकावर आहे. 

ठळक मुद्दे सीआयडीचा पोलीस महासंचालकांना अहवाल   राज्यात ५२ टक्के गुन्ह्यात फिर्यादी, साक्षीदार फितूर

  सुनील पाटील  जळगाव : भारतीय दंड विधान अंतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिध्दीत जानेवारी महिन्यात जळगाव राज्यात चौथ्या तर नाशिक परिक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे दोष सिध्दीचे प्रमाण ५०.१२ टक्के असून १५ हजार १२३ गुन्ह्यांपैकी ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागलेली आहे. जिल्ह्यांमध्ये नागपूर ग्रामीण प्रथम (७७.७९ टक्के) तर जळगाव जिल्हा चौथ्या (६५.१२ टक्के) क्रमांकावर आहे. राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्याकडे राज्यातील आयुक्तालये व जिल्हास्तरावरील गुन्हे व दोषसिध्दीचा अहवाल पाठविला आहे.आयुक्तालयात पिंपरी चिंचवड तर जिल्हास्तरावर नागपूर ग्रामीण प्रथम क्रमांकावर आहे. सत्र न्यायालयातून निकाल लागलेल्या भादवि अंतर्गत दोषसिध्दीचे न्रमाण १९.३१ टक्के तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातून निकाल लागलेल्या गुन्ह्यांचे दोषसिध्दीचे प्रमाण ५१.८७ टक्के इतके आहे.    दरम्यान, न्यायालयात एकूण ७ हजार ५४३ निर्दोष झालेल्या गुन्ह्यांपैकी ३ हजार ९७३ (५२.६७ टक्के) गुन्ह्यांमध्ये फिर्यादी, साक्षीदार व पंच फि तूर झालेले आहेत. यवतमाळमध्ये सर्वाधिक २४१ गुन्ह्यात पंच, फिर्यादी व साक्षीदार फितूर झाले आहेत. जळगावही राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. त्यात ५३ गुन्ह्यात फितूरचे प्रमाण आहे. फिर्यादी फितूर होऊन गुन्हे निर्दोेष सुटण्याची टक्केवारी १३.८९ इतकी आहे.    अनुसूचित जाती-जमातीच्या गुन्ह्यात ७ टक्के शिक्षा  राज्यात जानेवारी महिन्यात अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत ७ .७ टक्के गुन्हयात शिक्षा झालेली आहे. ९९ पैकी फक्त ७ गुन्ह्यात शिक्षा झाली आहे. उस्मानाबाद व बीडमध्ये सर्वाधिक शिक्षा झालेल्या आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये शंभर टक्के शिक्षा झाल्या आहेत. अहमदनगरमध्येही एका प्रकरणात शिक्षा लागलेली आहे.    बेशिस्त वाहतूक गुन्ह्यात शिक्षेत जळगाव प्रथम     डिसेंबर महिन्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणाची तुलना केली असता, चालू महिन्यात १४.५७ टक्क्याने घट झालेली आहे.तसेच तत्सम महिन्याच्या तुलनेत २०.४३ ने वाढ झालेली आहे. एकुण शिक्षा झालेल्या ७ हजार ५८० गुन्ह्यांमध्ये भादवि कलम २८३ (बेशिस्त वाहतूक, रस्त्यात अडथळा) ३ हजार ९५३ गुन्ह्यात दंडाची शिक्षा झालेली आहे. त्यात सर्वाधिक शिक्षा जळगाव जिल्ह्यात (३४६) झालेल्या आहेत. मुंबई शहर (२६३) दुसºया तर पुणे ग्रामीण तिस-या (२१८) क्रमांकावर आहे.  

महिला अत्याचार व खुनाच्या गुन्ह्यात मात्र घट

अपघात व इतर गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण कौतुकास्पद असले तरी महिला अत्याचार व खुन तसेच खुनाचा प्रयत्न करणे या गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण संपूर्ण राज्यातच कमी आहे. जानेवारी महिन्यात महिला अत्याचाराच्या ८६९ गुन्ह्यापैकी फक्त १०३ गुन्ह्यातच (११.८५ टक्के) शिक्षा झालेली आहे. बलात्काराच्या २३७ गुन्ह्यांपैकी फक्त ५९ गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रमुख गुन्ह्यांचे दोषसिध्दीचे प्रमाण चिंताजनकच असल्याचे सीआयडीच्या अहवालात म्हटले आहे.गुन्ह्यांमध्ये दोषसिध्दीचे प्रमाण वाढावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जावून आढावा घेवून काही सूचना केल्या होत्या. त्यामुळे उच्च पदस्थ पोलीस अधिकारी स्वत: गांभीर्याने लक्ष घालून गुन्ह्यांची दर पंधरा दिवसात माहिती व आढावा घेतात. दोषारोप सदोष कसे पाठविता येईल, यासाठी काळजीपूर्वक काम होऊ लागले. साक्षीदारांना संरक्षण मिळू लागल्याने ते निर्भीडपणे साक्षी देत आहेत त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढले आहे. जळगाव चौथ्या क्रमांकावर असल्याने नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात प्रेमप्रकरणाचेच अधिक प्रकरणे आहेत. लग्नानंतर ही केस आणखी कमकुवत होते, त्यामुळे या गुन्ह्यात दोषसिध्दीचे प्रमाण कमी आहे.-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील

७५४३ गुन्हे निर्दोष३९७३ गुन्ह्यात फिर्यादी, साक्षीदार फितूर१०३ महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा३९५३ अपघाताच्या गुन्ह्यात शिक्षा

असे आहेत शिक्षेतील टॉप फाईव्ह जिल्हे

नागपुर ग्रामीण : ७७.८९ टक्केठाणे ग्रामीण : ७४ टक्केचंद्रपुर : ६९.६८ टक्केजळगाव : ६५.१२ टक्केगोंदीया : ६०.३१ टक्के

असे आहेत शिक्षेतील टॉप फाईव्ह आयुक्तालये

पिंपरी-चिंचवड : ८९.०४ टक्केपुणे शहर : ८४.३२ टक्केसोलापुर शहर : ८३.६५ टक्केमुंबई शहर : ५७.८१ टक्केनाशिक शहर :  ५५.५९ टक्के 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव