शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

खुबचंद साहित्या हल्ला, दोघांचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:14 IST

जळगाव : बांधकाम व्यावसायिका खुबचंद साहित्या यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश अशोक बाविस्कर (२५, रा.तुरखेडा, ता. ...

जळगाव : बांधकाम व्यावसायिका खुबचंद साहित्या यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या गणेश अशोक बाविस्कर (२५, रा.तुरखेडा, ता.जळगाव) व नरेश नंदू आगरिया (२४,रा.वाघ नगर) या दोघांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला.खुबचंद साहित्या यांच्यावर १६ जानेवारी रोजी रात्री ८.१५ वाजता गोरजाबाई जिमखान्यासमोर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणी माजी महापौर ललित कोल्हेसह राकेश चंदू आगरिया (२२, रा.वाघ नगर), निलेश उर्फ बंटी नंदू पाटील (२४, रा. फागणे, ता. जि. धुळे ह.मु.ललित कोल्हे यांचे घर), नरेश नंदू आगरिया (२४, रा.वाघ नगर) व गणेश अशोक बाविस्कर (२५, रा. तुरखेडा, ता.जळगाव) या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी राकेश व निलेश यांना २१ जानेवारी रोजी तर नरेश व गणेश या दोघांना २२ जानेवारी रोजी अटक झाली होती. मुख्य आरोपी ललित कोल्हे घटना घडल्याच्या दिवसापासून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.अशी आहे जामीन नाकारण्याची कारणेअटकेतील नरेश आगारीया व गणेश बाविस्कर या दोघांतर्फे न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आले. त्यावर न्या. आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात मंगळवारी कामकाज झाले. या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा असून गुन्हा अजामीनपात्र असून सत्र न्यायालयात चालणार आहे, संशयित हे गुंडगिरी करण्यासाठी ललित कोल्हेकडे अंगरक्षक व चालक आहे,ते जामिनावर सुटल्यावर ललित कोल्हे यास फरार राहण्यास मदत करतील, तसेच साक्षीदारांना धमकावून तपासकामी अडथळा निर्माण करतील, या कारणांच्या आधारावर सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी युक्तीवाद केला.त्यावर न्या. आर.जे. कटारिया यांनी दोघांचे जामीनअर्ज फेटाळून लावले आहे.ललित कोल्हेविरुध्द अनेक गुन्हेया गुन्ह्यात फरार असलेले संशयित ललिल कोल्हे याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो कायद्याला जुमानत नसल्याचे म्हटले आहेत. तसेच शिक्षा झालेली असतांनाही महापौर झाला असून त्याच्याकडे राजकीय व आर्थिक पाठबळ असल्याने फिर्यादी साहित्या यांच्या जीवास धोका असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव