शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आजचा काळ रंगभूमीसाठी पोषक नाही - नाटककार जयंत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:43 IST

नाटक जगण्यासाठी हौशी रंगभूमी जगणे गरजेचे

आनंद सुरवाडेजळगाव : नाटकांमध्ये शोध थांबलेला आहे, त्यामुळे नाटक ज्या झपाट्याने पुढे जायला हवे होते तसे ते जात नाहीय़ आजचा जो काळ आहे तो रंगभूमीला पोषक नाही, असे मत ज्येष्ठ लेखक, नाटककार, नाट्य समिक्षक जयंत पवार यांनी मांडले़विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमासाठी ते सोमवारी जळगावात आले होते. ह्यलोकमतह्णने त्यांच्याशी संवाद साधला़ हौशी रंगभूमीला उत्तेजना मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले़प्रश्न: आजचे नाटक कुठल्या स्थानी आहे?जयंत पवार: व्यावसायीक नाटक चांगली वाटचाल करीत आहेत. पण एकूण नाटक पुढे जाण्याच्या दृष्टीने हा काळ बिकट आहे़प्रश्न : नवीन पिढीच्या नाटकांकडे कसे बघता ?नवीन पिढीमध्ये नाटककार कमी आहेत़ याचामध्ये व्यावसायिक रंगभूमीवर नवीन आशयाची नाटके येत नाही़ ही नाटके सादरीकरणामध्ये चटपटती व आकर्षक नक्कीच झाली आहे, मात्र, नवीन विषय जे आजच्या जीवनाशी निगडीत आहे ते मांडत नाहीत, वरवरचा मुलामा असा दिसतो की आजच्या स्थितीतबाबत बोलतात मात्र, ते जे बोलतात त्यातून ते कालचेच विधान करतात़ विधान म्हणून आजच काही येत नाही़प्रायोगिक रंभूमीची आजची अवस्था काय आहे?जयंत पवार: अत्यंत बिकट आहे कारण प्रायोगिक रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी जे रंगकर्मी हवेत त्यांची वाणवा आहे़ नाटकारांमध्ये रंगभूमीचा, नाट्यतत्त्वांचा शोध घेण्याची ईर्ष्या नष्ट झालेली आहे़ दोन चार लोक व दोन चार संस्थांसाठीच प्रायोगिक रंगभूमी आहे़प्रश्न: सध्याच एकंदरीत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण आजच्या नाटकांमध्ये झळकते का?जयंत पवार: पुरेस जाणवत नाही़ व्यावसायिक नाटक हे राजकीय परिस्थितीपासून कायमच पळत राहीले आहे़ त्यांनी तो धोका घेतलेला नाही़ आणि नाटकांमधील सामाजिकता ही वरवरची वाटते़ ती खूप शहरी सामाजिक आहे़ ग्रामीण जीवन नाटकांमध्ये कधीच आली नाही़ याला अगदी मोजकेच अपवाद आहेत़ शोध थांबलेला आहे़ नाटक झपाट्याने पुढे जात नाही़ आजचा काळ हा रंगभूमीला पोषक नाही़प्रश्न: नाटक जगविण्यासाठी काय व्हायला हवे?जयंत पवार: हौशी रंगभूमी जगायला पाहिजे़ हौशी रंगभूमीला उत्तेजना मिळेल असे प्रयत्न सरकार आणि नाट्यपरिषदेकडून व्हायला हवेत़या रंगभूमीला जाणवणाने अडथळे कसे कमी होतील हे पाहिले पाहिजे़ जळगावात जी हौशी पातळीवर काम करतात ती तळमळीने काम करतात त्यांना स्थानिक प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे़ परिवर्तन संस्थेने केलेली नाटके चांगली आहेत़

टॅग्स :Jalgaonजळगाव