पाल, ता. रावेर : वन्यजीव संस्थेच्या वतीने जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर रॅलीचे आयोजन यंदाही केले. पाल आणि गारखेडा येथील आदिवासी बांधवांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष हाताळणी, बचाव आणि उपाययोजना या विषयावर २० व्याघ्रदूतांच्या सहभागाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचे उद्घाटन यावल प्रादेशिकचे वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित व्याघ्रदूतांना वन्यजीव अभ्यासक अनिल नारखेडे, संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव संरक्षक रवींद्र फालक, अनिल महाजन, यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते जनजागृती माहिती पत्रकाचे प्रकाशन करून पाल येथील वनविभाग कार्यालयापासून ‘वाघ वाचवा सातपुडा वाचवा’, ‘वन आहे तर जीवन आहे,’ अशा घोषणा देत रॅली निघाली.
बालकांसाठी मनोरंजन म्हणून विविध उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी रॅलीचा समारोप करण्यात आला.
या जनजागृती रॅलीत उपाध्यक्ष विजय रायपुरे, सतीश कांबळे, बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, सचिव योगेश गालफाडे, अमन गुजर, नीलेश ढाके, स्कायलेब डिसुझा, ऋषी राजपूत, मुकेश सोनार, गणेश सोनवणे, तुषार रंधे, दुर्गेश आंबेकर, प्रदीप शेळके, जगदीश बैरागी आदी उपस्थित होते.