शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातला वाघ रमला केळीच्या बागेत! अपुरे भक्ष्य आणि जंगलतोडीचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 03:54 IST

जळगाव जिल्हा वनक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. यातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील काही वनक्षेत्र यावल वन विभागांतर्गत येते. मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यांतील वढोदा वनक्षेत्राचा भाग हा जळगाव वनक्षेत्रात येतो.

- अजय पाटीलजळगाव : वढोदा वनक्षेत्रातील जंगल असुरक्षित झाल्याने येथील वाघ आता केळीच्या बागेत रमला आहे. वाघांची तिसरी पिढी या बागेत वाढत असून ‘बनाना टायगर’ म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे.जळगाव जिल्हा वनक्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. यातील रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील काही वनक्षेत्र यावल वन विभागांतर्गत येते. मुक्ताईनगर, जामनेर तालुक्यांतील वढोदा वनक्षेत्राचा भाग हा जळगाव वनक्षेत्रात येतो. या वनक्षेत्रात पाच ते सहा वाघ असून, यावल वनक्षेत्रात तीन ते चार वाघ आहेत.वढोदा वनक्षेत्रात वृक्षतोड व अतिक्रमण यामुळे वाघांना राहण्यास जागाच शिल्लक राहिली नाही. या वनक्षेत्रात बाभळी प्रचंड वाढल्या आहेत. तसेच येथे उन्हाळ्यात तापमान प्रचंड असते. अशा परिस्थतीत गारवा मिळावा म्हणून वढोदा वनक्षेत्राला लागून असलेल्या पूर्णा नदीच्या खोऱ्यातील केळीच्या बागांमध्येच आता वाघांनी आपला घरोबा केला आहे.केळीच्या बागा या वाघांसाठी प्रजनन व शिकारीसाठी उपयुक्त ठरत असल्याने वाघ या बागांत राहणे पसंत करीत असल्याचे वाघांचे अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र नन्नवरे यांनी सांगितले. ‘बनाना टायगर’च्या अस्तित्वासाठी सातपुडा बचाव समितीतील सदस्य अभय उजागरे, राजेंद्र नन्नवरे, वन्यजीव संरक्षण संस्था अनेक वर्षांपासून झगडत आहेत.ही तर वाघांची मजबुरीजळगावचा वाघ जरी ‘बनाना टायगर’ म्हणून ओळखला जात असला तरी वाघाला हा अधिवास मजबुरीतून स्वीकारावा लागला आहे. वढोदा वनक्षेत्रात वाढत जाणाºया वेड्या बाभळी, भक्ष्याचा अभाव यामुळे जंगलातील वाघ केळीच्या बागांमध्ये वास्तव्य करीत आहेत.- किशोर रिठे, संस्थापक अध्यक्ष,निसर्ग फाऊंडेशन, अमरावती

टॅग्स :leopardबिबट्याJalgaonजळगाव