शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सावखेड्याजवळ द बर्निग ट्रक चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:22 IST

धरणगांव चोपडा मार्गावरील सावखेडा गावाबाहेर मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार नागरिकांनी २६ रोजी दुपारी अनुभवला.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किंटमुळे घटना घडल्याचा अंदाजचालक व वाहकांनी प्रसंगावधान राखत मारली उडीआगीमुळे दोन्ही बाजूच्या रहदारीचा खोळंबा

धरणगाव : धरणगांव चोपडा मार्गावरील सावखेडा गावाबाहेर मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याने ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार नागरिकांनी २६ रोजी दुपारी अनुभवला. आगीत चारचाकीचे पुर्ण नुकसान झाले आहे. चालक व वाहकाने प्रसंगावधान राखत गाडीबाहेर उडी मारल्याने प्राणहानी टळली. ही घटना शॉर्ट सर्किंटमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.मंगळवार २६ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा मार्गावरून मध्य प्रदेशाकडे जाणारी मालवाहू चारकचाी क्र. एम.पी.६८ एच - १५७ ने सावखेडा गावाबाहेर अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच वाहक व चालकांनी खाली उड्या मारल्या. गाडीत पी.व्ही.सी.पाईप तयार करण्यासाठी लागणाºया ग्रॅलुक्स भरलेले होते. त्यामुळे आग अधिकच भडकली . खा.शि.मंडळाचे अध्यक्ष अनिल कदम यांनी चोपडा न.पा.ला फोन करीत अग्निशमन विभागाच्या वाहनांना बोलविले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी आगीवर नियंत्रण मिळविले . या घटनेमुळे अर्धा ते पाऊण तापापर्यंत दोन्ही बाजूची रहदारी पुर्णत:ठप्प झालेली होती.

टॅग्स :fireआगJalgaonजळगाव