शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

नाथ प्लाझा येथे फोडले एटीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:28 IST

नाथ प्लाझामधील प्रकार : बॅँकेचा सायरन अन् सतर्क पोलीस यंत्रणेमुळे चोरटा जेरबंद

जळगाव : अनेक प्रयत्न करुनही कर्ज फिटत नसल्याने विजय बन्सी अहिरे (३०, रा.खेडी बुद्रुक, जळगाव) या तरुणाने मध्यरात्री गोलाणी मार्केट परिसरातील नाथप्लाझा संकुलातील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडले.मशीनमध्ये छेडछाड होताच अत्याधुनिक यंत्रणेमुळे हैदराबाद येथील मुख्यालयात सायरन वाजला...आणि क्षणातच स्थानिक पोलीस एटीएमजवळ पोहचले. विजय याला बाहेर पडतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.चित्रपटातील कथेप्रमाणेच ही घटना घडली. तोंडाला मास्क, डोक्याला रुमाल तसेच एटीएम फोडण्यासाठी आवश्यक असे सर्व साहित्य घेवून विजय एटीएम फोडण्यासाठी आला होता. त्याच्याकडून पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे त्याच्या बॅगेत दारुच्या दोन बाटल्याही मिळून आल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यापूर्वी देखील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एटीएम फोडण्याचा असाच प्रयत्न झाला होता.गोलाणी मार्केट परिसरात नाथा प्लाझा व्यापारी संकुलात स्टेट बँकेचे एटीएम आहे. या बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड किंवा काही गैरप्रकार होत असल्यास बँकेच्या हैदराबाद येथील कार्यालयात सायरन वाजतो. रविवारी रात्री १.३८ वाजता नाथा प्लाझातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न होताच हैदराबाद येथून शहर पोलीस ठाण्यात फोन खणखणला. ठाणे अंमलदार निलेश बडगुजर यांना फोनवरुन नाथा प्लाझा कॉम्प्लेक्समधील एटीएम फोडण्याचा प्रकार करत असल्याची माहिती मिळाली.एटीएमच्या बाहेर पडतानाच समोर पोलीसठाणे अंमलदार बडगुजर यांनी तत्काळ गस्तीवरील शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील गजानन बडगुजर व भास्कर ठाकरे यांना माहिती कळविली. दोघेही कर्मचारी शाहू नगरात हाणामारीच्या प्रकाराची चौकशी करत होते. मात्र ठाणे अंमलदाराकडून एटीएम फोडण्याच्या प्रकाराची माहिती मिळताच दोघांनी तत्काळ नाथा प्लाझा संकुल गाठले. एटीएम मशीनच्या बाहेर दोघं कर्मचारी थांबले.त्याचवेळी तोंडाला मास्क तसेच पाठीवर बॅग लटकविलेला तरुण एटीएमच्या बाहेर पडला. कर्मचारी गजानन बडगुजर यांनी तत्काळ मोबाईलमध्ये तरुणाचा फोटो काढला, यानंतर तरुणाने तोंडावरील मास्क काढले. बडगुजर तसेच भास्कर ठाकरे यांनी दोघांनी तरुणाची चौकशी केली असता मुंबईला जात असून पैसे काढण्यासाठी आला होतो, अशी खोटी माहिती दिली. कर्मचा-यांनी पैसे निघाले काय अशी विचारणा केल्यावर तरुणाने नाही असे उत्तर दिले. संशय आल्याने बडगुजर व ठाकरे यांनी तरुणाला थांबवून ठेवत एटीएमच्या आतमध्ये जावून पाहणी केली असता, चारही बाजूने एटीएम फोडलेले दिसून आले. त्याला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव