शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हुडकोत पोलिसांवरच दगडांचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:59 IST

फौजदारासह पोलीस कर्मचारी जखमी : ८ जणांना केले अटक

जळगाव : पिंप्राळा हुडकोतील सिध्दार्थ नगरात सोमवारी रात्री दोन गटात वाद होऊन दंगल उसळली. धारदार शस्त्र, लाठ्याकाठ्यांचा वापर यात झाला. दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या रामानंद नगर पोलिसांवरच जमावाने दगडांचा मारा केला. त्यात सहायक फौजदार गोपाळ चौधरी व रुपेश सुरेश ठाकरे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले तर एका गटातील चारजण जखमी झाले. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या २९ जणाविरुध्द दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला या घटनेत किरण किशोर खैरनार, रंजना किशोर खैरनार, शुभम पवार व विजय नाना कदम हे जखमी झाले तर या घटनेप्रकरणी भागवत रामचंद्र सुरवाडे, दीपक जगन भालेराव, बापू प्रकाश सोनवणे, राजू वसंत निकम, वसंत नथ्थू निकम, शंकर वसंत निकम, राहूल नामदेव इंगळे, हितेश नाना बाविस्कर, लताबाई नाना बाविस्कर, सविता दीपक भालेराव, सीमा भागवत सुरवाडे, ज्योती पिंटू भालेराव, छाया वसंत निकम, कल्पना अशोक सपकाळे, वर्षा संजय पवार, गीता दगडू बिºहाडे, रेखा गोपाळ कचोरे, पूजा किरण सपकाळे, किरण अशोक सपकाळे, चेतन बाविस्कर, फकिरा अडकमोल, राहूल गजरे, अजय अशोक सपकाळे, विजय नाना कदम व आनंदा प्रकाश सोनवणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला, तर सुरवातीच्या आठ जणांना अटक झाली आहे.अदखलपात्र गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणे भोवलेगेल्या आठवड्यातच याच भागात दोन गटात वाद झाला होता. तेव्हा एका महिलेला एकटी पाहून बेदम मारहाण झाली होती. तेव्हा महिलेने रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्याची अदखलपात्र म्हणून पोलिसांनी नोंद घेतली, मात्र पुढे चौकशी करणे टाळले, त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी पुन्हा हेच दोन गट लाठ्याकाठ्या व शस्त्र घेऊन एकमेकावर चालून आले. तेव्हाच तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली असता तर ही दंगलीची घटना टाळता आली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.पोलीस चौकी असून नसल्यासारखीपिंप्राळा हुडकोत प्रवेश करतानाच चौकात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या पोलीस चौकीवर कधीच कर्मचारी थांबत नसल्याची ओरड आहे. थांबत असतील तर ते फक्त कागदोपत्रीच. त्यामुळे या भागात पोलिसांचा दबदबा राहिलेला नाही. दारु, सट्टा यासारखे अवैध धंदेच या वादांना कारणीभूत ठरत आहेत. गावठी दारु विक्री करणाऱ्यांची मोठी संख्या या भागात आहे. किरकोळ कारणावरुन हुडकोत नेहमीच दंगल झालेली आहे. पोलिसांसाठी हा भाग ‘हॉटस्पॉट’ ठरलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव