शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डोळयात मिरचीची पूड फेकून रस्तालूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 19:21 IST

तीन युवकांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दिव्यांग व्यावसायिकाला २० हजारात लुटल्याची घटना कमानी तांडा ते जांभूळ गावाच्या दरम्यान रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपहूर नजीकची घटनातीन जणांना अटक, समयसूचकतेमुळे दिव्यांग इसमाचे वाचले प्राण

मनोज जोशीपहूर ता. जामनेर : तीन युवकांनी डोळ्यात मिरचीची पूड फेकून दिव्यांग व्यावसायिकाला २० हजारात लुटल्याची घटना कमानी तांडा ते जांभूळ गावाच्या दरम्यान रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. रस्ता लुटीसाठी वापरलेला बनावट कट्टा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोपाल सुखदेव भिवसने उर्फ चड्डी बाळू, अनिकेत कडूबा चौथे उर्फ दाऊद (रा. पहूर कसबे) आणि चेतन प्रकाश जाधव यांचा समावेश आहे. यातील सुखदेव याचे राजेद्र यांच्या दुकानात येणे जाण्याचा नेहमी संपर्क असून रविवारी पाळत ठेवून होता.मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र धोंडू पाटील या दिव्यांगाचे पहूर येथे कृषी निविष्ठा दुकान आहे. दररोज जांभूळ ते पहूर दुचाकीवरून ते ये_जा करतात. रविवारी रात्री ९ वाजेच्या राजेंद्र पाटील हे २० हजाराची रोकड घेऊन अविनाश संजय पवार या साथीदरासह घराकडे निघाले.कमानी तांडा व जांभुळ गावाच्या दरम्यान दुचाकीवरून तीन युवक मागावून आले आणि त्यांनी राजेद्र यांच्या डोळयात मिरचीची पूड फेकली. डोळयात पूड गेल्याने राजेद्र हे दुचाकीसह खाली पडले. ही संधी साधत या तीनही जणांनी त्यांच्याकडील पैसे काढून घेतले आणि जांभूळच्या दिशेने पळ काढला. परिस्थितीचे भान राखून राजेद्र पाटील हे जांभूळकडे न जाता ते कमानी तांडयाकडे परतले. यामुळे त्यांचा आणि सोबतच्या साथीदाराचा जीव वाचला कारण मारेकरी पुढे जाऊन दबा धरुन बसण्याची शक्यता होती.इकडे राजेद्र हे कमानी तांड्यात पोहोचले. तेथील युवकांना आपबीती सांगितली. पिंपळगाव बुद्रुक येथे रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.याचवेळी तीन जण पिंपळगावकडे येत असल्याची येत असल्याची माहिती काही युवकांना मिळाली. त्यांनी रस्त्यावर टायर टाकून दुचाकीस्वारांना अडविले आणि या तीनही जणांना चांगलाच चोप दिला आणि रात्री १२.३० वाजता या तीनही जणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनास्थळी बनावट गावठी कट्टाही आढळून आला.पाचोरा विभागाचे डिवायएसपी ईश्वर कातकडे यांनी सोमवारी घटनास्थळी जात माहिती घेतली. राजेद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तीन युवकांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.दुचाकी, बनावट कट्टा, एक हजार रोख जप्त केले आहे. सोमवारी जामनेर न्यायालयात हजर केले असता तीनही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJamnerजामनेर