शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चोरलेले सोने जळगाव शहरात मोड करणा-यासाठी आलेल्या दोन महिलांसह तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:43 IST

ज्वेलर्समध्ये विक्रेत्यांचे लक्ष विचलित करुन दागिने लांबविणाºया सुपियाबी शेख मुसीब (वय ३६ ), नजमाबी शेख जावीद शेख (वय २६) दोन्ही रा.खडका, भुसावळ या दोन महिलांसह जावेद मुसा गराना (वय २७ रा.निंबायती मिठी खाडी, सुरत) या तिघांना शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी पकडले. चोरीचे दागिने ज्वेलर्समध्ये मोड करण्यासाठी ते शहरात आले होते, तत्पूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

ठळक मुद्देदोन्ही महिला भुसावळच्या तर तरुण सुरतचापोलिसांनी लावला सराफ बाजारात सापळा कारसह साडे तीन लाखाचा ऐवज जप्त

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२९: ज्वेलर्समध्ये विक्रेत्यांचे लक्ष विचलित करुन दागिने लांबविणा-या सुपियाबी शेख मुसीब (वय ३६ ), नजमाबी शेख जावीद शेख (वय २६) दोन्ही रा.खडका, भुसावळ या दोन महिलांसह जावेद मुसा गराना (वय २७ रा.निंबायती मिठी खाडी, सुरत) या तिघांना शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी पकडले. चोरीचे दागिने ज्वेलर्समध्ये मोड करण्यासाठी ते शहरात आले होते, तत्पूर्वीच ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.दरम्यान, या तिघांकडून १ लाख ५२ हजार ३१३ रुपये किमतीचे दागिने, चोरीचे १५ हजार रुपये व कार असा ३ लाख १८ हजार २०६ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.  गुजरात पासींग असलेली एक कार (क्र.जी.जे.२१ ए.एच.२६२३) शहरात आलेली असून दोन महिला व एक तरुण असे तिघं जण चोरलेले दागिने सराफ बाजारात मोडसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, उल्हास चºहाटे, संगीता खांडरे, संजय हिवरकर, गणेश शिरसाळे, संजय भालेराव, सुधीर साळवे, मोहसीन बिराजदार, अक्रम शेख, इम्रान सय्यद, अमोल विसपुते व रतन गिते यांचे पथक तयार केले. या पथकाने सराफ बाजारात सापळा लावून दुपारी अडीच वाजता कार सह तिघांना ताब्यात घेतले.अनेक ठिकाणी चोरले सोनेपकडण्यात आलेल्या तिघांनी आतापर्यंत जळगाव जामोद, खामगाव, अकोला, शेगाव, बोदवड व अडावद येथील ज्वेलर्समधून लक्ष विचलित करुन दागिने लांबविले आहेत. त्याची कबुलीही त्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, लहान ज्वेलर्समध्ये चोरलेले दागिने जळगाव शहरात मोड केले जातात. या टोळीने अनेक ठिकाणी कारनामे केल्याची शक्यता आहे. जावेद हा सुरतचा रहिवाशी असून तो सुपियाबी व नजमाबी यांचा नातेवाईक आहे.आजीची पर्स लांबविल्याची कबुलीनातूच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी आलेल्या सरलाबाई भगवान जळके (वय ५० रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) या महिलेजवळील ३५ हजार रुपये रोकड असलेली पर्स फुले मार्केटमधून गेल्या आठवड्यात लांबविण्यात आली होती. तोंडाला रुमाल बांधलेली महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली होती. ती पर्स या दोन्ही महिलांनी लांबविल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा