शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील तिघांना पळवून नेणाºयाच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 21:09 IST

जळगाव : कारागृहातून पलायन केलेल्या तीन जणांना दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत करणाºया जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) ...

जळगाव : कारागृहातून पलायन केलेल्या तीन जणांना दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत करणाºया जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री पकडले. सुरतला जात असतानाच ट्रॅव्हल्स बसमध्ये पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. दरम्यान, यातील तीनही संशयित फरार असून ते देखील लवकरच हाती लागतील, अशा आशा आता पोलिसांच्या बळावल्या आहेत.गेल्या महिन्यात २५ जुलै रोजी गेट किपर म्हणून ड्युटीला असलेल्या कारागृह रक्षक पंडीत दामु गुंडाळे (४७) यांच्या डोक्याला गावठी पिस्तुल लावून सुशील अशोक मगरे (३२,रा.कसबे पहूर, ता.जामनेर),गौरव विजय पाटील (२१, रा.तांबापुरा,अमळनेर) व सागर संजय पाटील (२२,पैलाड,अमळनेर) या तीन न्यायालयीन बंदींनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची घटना घडली होती. या तिघांना घेण्यासाठी बाहेर जगदीश पाटील हा दुचाकीवर थांबलेला होता.त्याच्यासोबत एकाच दुचाकीवर हे चौघे जण पळून गेले होते.दुचाकीही निघाली चोरीचीया गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील चोरीचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारागृहातून बाहेर आल्यावर सर्व जण नंदूरबार येथे गेले. तेथून सुशील मगरे व गौरव पाटील दोघं जण सोबत तर सागर पाटील व जगदीश पाटील हे दोघं जण सोबत परंतु वेगवेगळ्या दिशेने गेले होते, अशी माहिती जगदीश याने तपासात पोलिसांना दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम या तिघांनी जगदीश याची स्वतंत्ररित्या चौकशी केली.सागर व गौरव या दोघांनी देखील कारागृहातून पलायन केल्यानंतर अमळनेरात येऊन दुचाकी चोरी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे.सुरतला जाण्यासाठी पारोळ्यातून बसलाजगदीश हा रविवारी रात्री सुरतला जाण्यासाठी एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बसला होता. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानंतर त्यांनी धुळे, साक्री येथील पोलिसांशी संपर्क साधून बसची माहिती दिली तर एक पथक बसच्या मागे रवाना केले. साक्रीजवळ बस अडवून जगदीश याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सागर पाटील हा सुरतमध्ये असल्याचा संशय असून त्याच्याच भेटीला जगदीश जात असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव