शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या सरासरीपेक्षा जळगावात कोरोनाच्या तीन हजार चाचण्या कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:14 IST

तपासण्या वाढविण्याची गरज : दहा लाख लोकसंख्येमागे साडेसात हजार लोकांची तपासणी

जळगाव : राज्याच्या सरासरीपेक्षा जळगावात अद्यापही तीन हजार चाचण्या कमी झालेल्या आहेत़ दर दहा लाख लोकसंख्येमागे किमान ९ हजार चाचण्या अपेक्षित असताना जळगावात त्या सहा हजारापर्यंत झाल्या असल्याची कबुली कोविड रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आयसीएमआरच्या निर्देशानुसार जळगावात सरासरीपेक्षा कमी चाचण्या होत असल्याचा मुद्दा मांडला होता. यावर वरील माहिती देण्यात आली आहे.दहा दिवसांपासून चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत़ त्या आधी अत्यंत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचे चित्र होते़ संशयित रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आल्याने दिवसाला सुमारे ९०० चाचण्या केल्या जात आहेत़ दरम्यान, आठवडाभरापूर्वी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीतही या चाचण्या चार हजारांनी कमी असल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता़२८९ कुटुंब अन् ९० टक्के बाधितमिळालेल्या माहितीनुसार जिल्हाभरातील २८९ कुटुंब व त्यातील ९० टक्के सदस्य बाधित आढळून आले आहेत़ यामुळे त्यांचे संपर्क कमी व त्यामुळे चाचण्या कमी झाल्याचे प्रशासनाकडून समोर येत आहे़ एका कुटुंबाच्या एका व्यक्तिचे जेवढे, तेवढेच अन्य व्यक्तिंचे कॉन्टॅक्ट या आधारावरच तपासण्या झाल्या़ त्यामुळे या चाचण्या कमी झाल्या व त्यामुळेच जळगावचा मृत्यूदर सर्वाधिक ठरला, असेही गणित मांडले जात आहे़ प्रत्येक रुग्णामागे त्याच्या संपर्कातील किमान १५ जणांची आरोग्य तपासणी गरजेची आहे़शहरात कमी तपासणीकेंद्रीय समितीच्या पाहणीतही शहरात कमी चाचण्या होत असल्याचा मुद्दा नवल कॉलनीतील पाहणीदरम्यान समोर आला होता़ या ठिकाणी १२ बाधित आढळले असताना केवळ २३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती़ यावर केंद्रीय पथकानेही आश्चर्य व्यक्त केले होते. प्रत्येक रुग्णामागे किमान दहा लोकांची तपासणी आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव