शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हरिविठ्ठल नगरातून ट्रक्टरसह ट्रॉली चोरणा-या तिघांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:20 IST

एलसीबीची कारवाई : ट्रॅक्टरसह ट्रॉली हस्तगत

जळगाव : हरीविठ्ठल नगरातील रहिवासी संदीप हटकर यांचे मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्‍यात पोलिसांना यश आले असून अरबाज दाऊत पिंजारी (२३), जितेंद्र सुभाष पवार (३६, दोन्ही, रा. हरिविठ्ठलनगर) व ईजाज खान मोहम्मद खान (२६, रा. मालेगाव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांच्या ताब्यातून चोरी केलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.हरीविठ्ठल नगरातील रहिवाशी संदिप सुभाष हटकर हे शेती करतात. त्यांच्याकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर (क्र.एमएच १८ झेड ३४३६) असून ते आजोबाच्या नावे आहे. दरम्यान, त्यांची आई आजारी असल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल होत्या. त्यामुळे शेतीचे काम बंद असल्यामुळे ट्रॅक्टर घरीच होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता संदीप हा दवाखान्यातून घरी आला असता त्यास १ लाख ७० हजार रूपये किंमतीचे ट्रक्टरसह ट्रॉली दिसून आले नाही. त्याच दिवशी त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे अंत्यविधी आटोपल्यानंतर ट्रॅक्टरसह ट्रॉलीचा शोधाशोध सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासून बघितले मात्र काहीही मिळून आले नाही. अखेर ट्रॅक्टर न मिळून आल्याने संदीप यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.चोरट्यांचा शोध घेवून केली अटकपोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी एक पथक तयार करून चोरट्यांचा शोध घेण्‍याच्या सूचना केल्या. पथकाने अरबाज पिंजारी, जितेंद्र पवार आणि ईजाज खान यांना अटक केली आहे. ही कारवाई जितेंद्र पाटील, सुधाकर आभोरे, रामकृष्ण पाटील, संजय सपकाळे, अशरफ शेख इंद्रिस पठाण यांनी केली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांजवळून ट्रॅक्टर व ट्रॉली हस्तगत करण्‍यात आलेले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव