बोदवड : शहरातील गौरीशंकर कॅम्पेक्स मधील खासगी कंपनीचे एटीएम तसेच नवकार ट्रेडर्स, शांती प्रॉव्हिजन व जामनेर रसत्यावरील अडत धान्य दुकान एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडले.या खासगी एटीएममध्ये सुदैवाने रोकड नसल्याने तेथे काहीच हाती लागले नाही. तर नवकार ट्रेडर्सचे कुलूप पूर्ण न तुटल्याने चोरी होताना वाचली. मात्र शांती प्रॉव्हिजन मधून चोरट्यानी गावरान तुपाच्या बरण्या, श्रीखंडाचे डबे व चार हजारच्या रोकड सह कोऱ्या नोटा असा एकूण बारा हजारापर्यंतचा माल चोरीला गेला. याचबरोबर जामनेर रस्त्यावरील धान्य दुकाना मधून गहूचे कट्टे चोरीस गेले आहे. या ठिकाणच्या नुकसानीचा आकडा मात्र कळू शकला नाही.सदर बाबत दुकानदारांनी बोदवड पोलिसात तक्रार दिली आहे.
एटीएमसह तीन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 17:46 IST