शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बस व कारच्या अपघातात धुळ्यातील तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 22:58 IST

धुळे येथील चौधरी कुटुंब हे मुलाचा पाचोऱ्याहून साखरपुडा आटोपून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी सात वाजता आशिया महामार्गावर पारोळा धुळे रोडवर विचखेडे गावानजीक बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील नवरदेवाचे वडील, बहीण आणि काकू हे तीन जण जागीच ठार झाले, तर आई, काका आणि पुतण्या हे गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देधुळ्यातील कुटुंबावर काळाची झडप

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळा : धुळे येथील चौधरी कुटुंब हे मुलाचा पाचोऱ्याहून साखरपुडा आटोपून घरी परतत असताना रविवारी सायंकाळी सात वाजता आशिया महामार्गावर पारोळा धुळे रोडवर विचखेडे गावानजीक बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील नवरदेवाचे वडील, बहीण आणि काकू हे तीन जण जागीच ठार झाले, तर आई, काका आणि पुतण्या हे गंभीर जखमी झाले आहेत.धुळे येथील संजय नारायण चौधरी (रा.टाटा मोटर्सच्या बाजूला) हे मुलगा दिनेश संजय चौधरी याचा साखरपुडा पाचोरा येथील प्रकाश चौधरी रा.प्रकाश टॉकीजजवळ या कुटुंबासोबत ९ रोजी होता. यासाठी संजय नारायण चौधरी हे आपली कार (एमएच-१८-बीसी-०५७५) सह अन्य दोन गाड्यांद्वारे गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास आशिया महामार्गा ४६ वर पारोळा धुळे रोडवर पारोळ्यापासून तीन कि.मी. अंतरावर विचखेडे गावानजीक धुळ्याकडून पारोळ्याकडे येणारी बस शिर्डी-भुसावळ (एमएच-२०-बीएल-३९४३) बसने जोरात धडक दिली. त्यात या कारमधील नवरदेवाचे वडील संजय नारायण चौधरी , बहीण मीनल संजय चौधरी, काकू सरला रविंद्र चौधरी हे तीन जण जागीच ठार झाले, तर आई नीता संजय चौधरी , काका रवींद्र नारायण चौधरी , पुतण्या विवान स्वप्नील चौधरी सर्व रा.धुळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे .

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा