भारूखेड्यातील तीन हातभट्या उद्ध्वस्त : सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 04:55 PM2019-09-25T16:55:43+5:302019-09-25T16:55:48+5:30

पहूर पोलिसांची कारवाई

 Three handcuffs destroyed in Bharukheda | भारूखेड्यातील तीन हातभट्या उद्ध्वस्त : सात जणांना अटक

भारूखेड्यातील तीन हातभट्या उद्ध्वस्त : सात जणांना अटक

Next



पहूर, ता.जामनेर : भारूखेडा, ता.जामनेर येथे पहूर पोलिसांनी मंगळवारी रात्री १२ वाजता जंगलात धाड टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्या उवस्त केल्या. यात भारूखेड्यात्3ाील सात जणांना अटक करून ४२ हजारांचे रसायन नष्ट केले आहे.
भारूखड्यात गावठी दारूचे अड्डे तालुक्यात प्रचलित आहेत. हातभट्टीवाल्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर असल्याने आद्यप ठोस कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी पाचोरा विभागाचे डीवायएसपी ईश्वर कातकडे यांच्या मोहिमेचा फज्जा उडवून गावठीची विक्री दुप्पट दराने सुरू असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मांडले आहे.
पहूरला नवीन रुजू झालेले साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी भारूखेड्यातील जंगलात तीन दिवस टेहळणी केली. मंगळवारी रात्री गावठीच्या तीन हातभट्या उद्ध्वस्त करण्यात पहूर पोलिसांना प्रथमच यश आले. याप्रकरणी सात जणांना अटक करून तब्बल ४२ हजारांचे रसायन वाडी भागात नष्ट केले आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांच्यासह जितेंद्र परदेशी, अनिल देवरे, ईश्वर देशमुख या पथकाने कारवाई केली असून तपास भरत लिंगायत करीत आहेत. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
उन्हाळ्यात वाडी भागातील युवकाचा विषारी दारूने बळी गेल्याची घटना घडली. त्यामुळे येथील महिलांनी संतप्त होऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांचे वाहन अडवून त्यांना घेराव घातला होता. त्यांनतर महाजन यांनी पोलीस अधिक्षकांची कानउघाडणीही केली होती. येथील बीटचे तत्कालीन दोन अमलदारांना पोलीस मुख्यालयात जमा केल्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केली होती.

यांना केली अटक
संजय हिरा गोसावी, रामसिंग काशीराम राठोड, दीपक सूर्यवंशी, अजय संजय गोसावी, मुन्ना मोहन गोसावी, करण मोहन गोसावी, प्रविण धारासिंग गोसावी सर्व रा.भारूखेडा.
भारूखड्यात हातभट्टी उद्ध्वस्त करून अटक केलेल्या चालकांसह राकेशसिंह परदेशी व पोलीस कर्मचारी.

Web Title:  Three handcuffs destroyed in Bharukheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.