शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात निवृत्त डॉक्टरकडे तीन लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:09 IST

पुणे येथे गेले होते शस्त्रक्रियेसाठी

जळगाव : पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी मधुकर माधवराव निराळे (वय ८२) या सेवा निवृत्त वैद्यकिय अधिकाऱ्याचे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ८० हजार रुपये रोख व एक लाख २० हजाराचे दागिने असा तीन लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी महाबळमधील शारदा कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयातून वैद्यकिय अधिकारी पदावरुन निवृत्त झालेले मधुकर निराळे हे पत्नी रजनी यांच्यासह शारदा कॉलनीतील शारदा गृहनिर्माण सोसायटीत वास्तव्याला आहेत. मुलगा सुहास व सुधीर दोन्ही जण कॅनडा येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहेत तर मुलगी माधुरी चिंचोले या गुलबर्गा (आंध्रप्रदेश) येथे वास्तव्याला आहे. त्यामुळे घरी दोघंच पती-पत्नी असतात. मधुकर निराळे यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया असल्याने पत्नीसह ते ३० जून रोजी पुणे येथे गेले होते. १८ जुलै रोजी भाचा मंदार पराग पाडसकर यांनी फोन करुन घराच्या दरवाजाचे कुलुप तुटलेले असून चोरी झाल्याची माहिती कळविली होती. शस्त्रकिया व वैद्यकिय उपचार झाल्यानंतर निराळे हे गुरुवारी जळगावात आले. घरी आल्यानंतर जिन्याजवळील दरवाजाची कडी व मुख्य दरवाचे कुलुप तुटलेले दिसले. कपाटीतील ऐवज लांबविण्यात आल्याचे लक्षात आले.८० हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचा १० ग्रॅम सोन्याचा शिक्का, ३० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅमच्या सोन्याच्या ४ अंगठ्या,५ हजार रुपये किमतीचे कानातील जोड, २२ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅमची सोनसाखळी, ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, ४५ हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा २ लाख ९० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव