शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसानंतरही वाहून गेलेला तरूण सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:03 IST

लक्ष्मीनारायण नगरातील नाल्यात पाय घसरून वाहून गेलेला हेमंत अरूण वाणी (वय-३८) हा तरूण तीन दिवसानंतरही अद्याप सापडला नाही़

ठळक मुद्देप्रशासनाकडून शोधकार्य सुरुचहातेड नाल्याची आपत्ती व्यवस्थापनाकडून पाहणीपाच किलोमिटरपर्यंत नाल्यात चालून घेतला शोधचोपडा तालुक्यातील तहसिलदारांना सुचना

जळगाव : लक्ष्मीनारायण नगरातील नाल्यात पाय घसरून वाहून गेलेला हेमंत अरूण वाणी (वय-३८) हा तरूण तीन दिवसानंतरही अद्याप सापडला नाही़  मनपा कर्मचाºयांसह आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाºयांच्या पथकाने दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी तरूणाचा शोध घेतला़गुरूवारी जोरदार पावसामुळे लक्ष्मीनारायण नगरातील नाल्याला पुर आला होता़ पुर आल्यामुळे हेमंत यांनी चार ते पाच विद्यार्थ्यांसह महिलांची मदत करून त्यांना नाल्यावरील पुलावरुन जाण्यास मदत केली़ तसेच एका गायीसही वाचविले.याठिकाणी असताना याच दरम्यान अचानक त्यांचा पाय घसरून तो नाल्यात पडून वाहून गेला. गुरूवारी दुपारी ही घटना घडली़ त्या दिवसापासून हेमंत यांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतू, हेमंत हे कोठेही मिळून आले नाही़ शुक्रवारी मनपा कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने घटनेच्या ठिकणापासून ते पाच किलोमीटरपर्यंत नाल्यात चालून शोध कार्य सुरू केले मात्र, काहीही आढळून आले नाही़शनिवारी चोपडा तालुक्यातील तहसिलदारांना शोध कार्य सुरू करण्याबाबत सुचना करण्यात आली असल्याची माहिती मिळते़ त्यानुसार ज्या ठिकाणी हा नाला जातो त्या-त्या ठिकाणाची पाहणी करण्याची व हेमंत यांना शोधण्याबाबत त्यांना सुचना केली आहे़ तसेच रविवारी देखील हेमंत यास शोधण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यू