जळगाव : एक किंवा दोन वर्षांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आदेशाचे उल्लंघन केले म्हणून तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात निखील सुरेश राजपूत (रा़ भुसावळ), शामल शशिकांत सपकाळे (रा़ भुसावळ) आणि परशुराम पाटील या तीन जणांचा समावेश आहे. निखील हा हद्दपार गुन्हेगार भुसावळ शहरात असल्याची माहिती मिळाली़ गुरुवारी भुसावळ शहरातील श्रीरामनगर भागात निखिल हा आढळला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.दोन वर्षांकरीता हद्दपार शामल सपकाळे हा गुरूवारी पोलिसांना भुसावळ शहरात आढळून आला़ तसेच परशुराम पाटील यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे़ तो गुरुवारी रात्री गस्ती दरम्यान पोलिसांना आढळून आला.
हद्दपार तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:06 IST