शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने मारण्याची धमकी देत तिघांनी जळगावात विद्यार्थ्यांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:23 IST

हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात गप्पा मारण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) या दोन विद्यार्थ्यांना २५ ते ३० वयोगटातील तिघांनी चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजता घडली. याप्रकरणी गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे मेहरुण तलाव परिसरातील घटना एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव : हॉटेलमधून जेवण करुन परत येत असताना मेहरुण तलाव परिसरात गप्पा मारण्यासाठी गेलेल्या यश जयंत पाटील (१९,रा.शिवराम नगर) व नरेश सदाशिव बारी (रा.नेपानगर, मध्य प्रदेश ह.मु.शिव कॉलनी) या दोन विद्यार्थ्यांना २५ ते ३० वयोगटातील तिघांनी चाकूने मारण्याची धमकी देत त्यांच्याजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजता घडली. याप्रकरणी गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश व त्याचा मित्र नरेश हे दोघं जण बुधवारी सायंकाळी शिरसोली रस्त्यावरील हॉटेलवर यशच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एल. ६५९३) जेवणासाठी गेले होते. रात्री साडे आठ वाजता जेवण करुन घरी परत येत असताना जकात नाक्याजवळ मेहरुण तलावाकडे जाणाºया रस्त्यावर गप्पा मारत असताना समोरुन तीन जण धावत आले व तुम्ही कोण? येथे कशासाठी आले असे सांगून धक्काबुक्की व धमकावत तुमच्या खिशात काय आहे?  असे म्हणत नरेशच्या खिशातून व बळजबरीने मोबाईल व पाकीट काढून घेतले. त्यानंतर यशच्या डिक्कीतील मोबाईल हिसकावला दोघांजवळील तीन मोबाईल व दीड हजार रुपये असा २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून कोणाला सांगितले तर चाकूने मारुन टाकेल, अशी धमकी देत ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने हे चोरटे निघून गेले.दरम्यान, घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे गेल्यावर रस्त्यावर वापरणाºया लोकांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. या सर्वांनी संशयितांचा मेहरुण तलाव परिसरत शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाहीत. त्यानंतर यश याने घरी वडील जयंत निळकंठ पाटील, मित्र प्रसाद पाठक, आशिष जाधव व नरेशचे मेहुणे लतीश सुभाष बारी यांना घटनेची माहिती दिली. या सर्वांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक रणजित शिरसाठ यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अज्ञात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव