शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जळगावात चांदी हजार रुपयांनी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:40 IST

चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांची घसरण झाली असून भाव ४० हजार ५०० रुपयांवर आले आहेत. सोन्याच्याही भावात आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरण झाली असून सोने ३१ हजारांवर पोहचले आहे.

ठळक मुद्देचांदीची मागणी ५० टक्क्यांवरसोन्याच्या भावातही आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरणदोन आठवड्यात चांदीत १३०० रुपयांनी घसरण

जळगाव : चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांची घसरण झाली असून भाव ४० हजार ५०० रुपयांवर आले आहेत. सोन्याच्याही भावात आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरण झाली असून सोने ३१ हजारांवर पोहचले आहे.गेल्या महिन्यात ब्राझील, लंडन येथून आवक कमी झाली असताना अधिक मासामुळे चांदीला चांगलीच मागणी होती. त्यामुळे चांदीला चकाकी येऊन चांदीचे भाव ४१ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र अधिक महिना संपल्यानंतर चांदीला मागणीही कमी झाली.औद्योगिक मागणी घटलीसध्या सुवर्ण बाजारात मंदीचे वातावरण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात लग्न तिथीही जास्त नसल्याने सोने-चांदीला उठाव नाही. त्यामुळे औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने मोठ्या व्यापारी व उद्योजकांनी सोने-चांदी खरेदीत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही कारणांनी मागणी घटून अधिक मासाच्या तुलनेत आता केवळ ५० टक्केच ग्राहकी असल्याचे सुवर्ण बाजारात चित्र आहे.गेल्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीच्या आवकवर परिणाम झाला होता. आता कोणत्याही घडामोडी नसल्या तरी ग्राहकीच नसल्याने त्याचा फटका सुवर्ण बाजारावर होत असल्याचे चित्र आहे.दोन आठवड्यात चांदीत १३०० रुपयांनी घसरण५ जून रोजी ४१ हजार ८०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात हळूहळू घसरण सुरू झाली. दोन आठवड्यात १३०० रुपयांनी घसरण होऊन चांदी ४० हजार ५०० रुपयांवर आली. ४१ हजार ८०० रुपयांवर ती ४१ हजार ५०० रुपयांवर आल्यानंतर २० जूनपर्यंत ती याच भावावर स्थिर राहिली. त्यानंतर २१ रोजी थेट एक हजार रुपयांची घसरण झाली व चांदी ४० हजार ५०० रुपयांवर आली. २२ रोजीदेखील याच भावावर चांदी स्थिर होती.सोनेही आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरलेसोन्यालाही मागणी नसल्याने त्याचेही भाव दररोज घसरत आहे. १५ जून रोजी ३१ हजार ५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात घसरण सुरू होऊन १६ रोजी ते ३१ हजार ३०० रुपयांवर आले. त्यानंतर २० रोजी ३१ हजार १५० आणि २१ रोजी ३१ हजार रुपयांपर्यंत सोन्याचे भाव घसरले.

टॅग्स :JalgaonजळगावGoldसोनं