शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

ज्यांची पात्रता ते बाहेर आणि पात्रता नसलेले ‘तेथे’ बसले, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 15:22 IST

ज्यांची पात्रता आहे, ते बाहेर आणि अपात्र लोक तेथे बसले आहे, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आजच्या राजकीय स्थितीवर टीका केली. 

जळगाव -  सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे या देशाची मोठी प्रगती झाली आहे. मात्र आज त्या पात्रतेचे लोक देशात नाही. उलट ज्यांची पात्रता आहे, ते बाहेर आणि अपात्र लोक तेथे बसले आहे, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आजच्या राजकीय स्थितीवर टीका केली.  भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे लेवा पाटील समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कुटुंब नायक रमेश विठू पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे,  खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे,  जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिनी खडसे, डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे,  जळगावचे महापौर ललित कोल्हे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, माजी आमदार रमेश चौधरी,  महाअधिवेशन समितीचे अध्यक्ष विष्णू भगाळे,  शिरीष चौधरी,  शामल सरोदे, मंदा खडसे  आदी  उपस्थित होते. 

या वेळी कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यनवरांनीदखील मनोगत व्यक्त केले.   माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भाषणाची या वेळी सर्वाना अत्यंत उत्सुकता होती.  आपल्या भाषणात एकनाथराव खडसे म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल हे या देशात जन्माला आहे, हे भाग्य आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लोहपुरुष ठरले व त्यांच्यामुळे देशाची प्रगती झाली. त्यांच्या पात्रतेमुळे ते तिथर्पयत पोहचले. मात्र आज परिस्थिती उलट आहे. ज्यांची पात्रता आहे ते आज बाहेर आहे तर ज्यांची पात्रता नाही ते तेथे बसले असले असा उल्लेख त्यांनी केला. 

विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्या

कवयित्री बहिणाबाई चौधरी या एकाच समाजाच्या नव्हत्या तर त्या खान्देश कन्या होत्या. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे, असा ठराव मी मांडत असल्याचे खडसे यांनी भाषणातून सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसे