शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

इंग्लंडमधील ते अविस्मरणीय सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST

द ओव्हल, १९७१ इंग्लंडमधील उन्हाळ्याचे ते अखेरचे दिवस होते. ओव्हलवर पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने ३५५ धावा केल्या होत्या. ...

द ओव्हल, १९७१

इंग्लंडमधील उन्हाळ्याचे ते अखेरचे दिवस होते. ओव्हलवर पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने ३५५ धावा केल्या होत्या. दुसरा दिवस पावसाने धुवून काढला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताने ७ बाद २३४ धावा केल्या आणि चौथ्या दिवशी सकाळी भारताचा डाव २८४ धावांवर संपला. इंग्लंडने दुसऱ्या डावाला उपाहाराच्या काही वेळ आधी सुरूवात केली. पण ओव्हलवर भागवत चंद्रशेखर यांच्या रुपाने वादळच आले. त्यांनी आपल्या फिरकीच्या जोरावर १८.१ षटकांत फक्त ३८ धावा देत सहा बळी घेतले. त्यावरही त्यांनी जॉन जेमीसन यांना धावबाद केले, तर बिशनसिंग बेदी यांनी एक बळी घेतला आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांनी २ बळी घेतले. त्यामुळे इंग्लंडला फक्त १०१ धावा करता आल्या. त्यानंतर भारताने ६ बाद १७६ धावा करत विजय मिळवला. त्यात अजित वाडेकर यांनी दुसऱ्या डावात ४५ आणि दिलीप सरदेसाई यांनी ४० धावा करत इंग्लंडला चीत केले.

द ओव्हल १९७९

अखेरच्या दिवशी चहापानाच्या वेळी भारतीय संघ ३०४ धावांवर एक बाद अशा परिस्थितीत होता आणि विजयासाठी फक्त १३४ धावा करायच्या होत्या. त्यावेळी पुरेशी षटकेदेखील होती. भारताचे कर्णधार श्रीनिवास वेंकटराघवन यांना ते सर्व क्षण आठवतात. जेव्हा चौथा डाव सुरू झाला. तेव्हा संघ विजयाबाबत विचार करत नव्हता. पण पहिला बळी २०० धावांवर गेला. तेव्हा संधी असल्याचे जाणवले आणि मग अशक्य ते शक्य असा प्रवास सुरू झाला. सुनील गावसकर यांनी दुहेरी शतक लगावले. त्यांनी एकही चूक केली नाही. त्यावेळी भारतीय संघ इतिहास रचणार होता. वेंकट यांनी कपिल देव यांना आधी फलंदाजीला पाठवले. मात्र, ते बाद झाले. त्यानंतर भारत ४२३ धावांवर ८ अशा स्थितीत पोहोचला. एका चेंडूत नऊ धावांची आवश्यकता असताना खेळ थांबवण्यात आला आणि हा सामना अनिर्णित अवस्थेत सुटला.

लॉर्ड्स, लंडन, १९८६

कपिल आणि लॉर्ड्स, वेंगसरकर आणि लॉर्ड्स यांचे नाते नेहमीच विशेष राहिले आहे. कपिल आणि त्यांच्या संघाने १९८३ मध्ये भारताला याच मैदानावर विश्वविजेता बनवले होते. त्यानंतर १९८६च्या कसोटी सामन्यातदेखील या मैदानावर यजमान इंग्लंडविरोधात त्यांनी विजय मिळवून दिला. याच मैदानात १९७९मध्ये त्यांनी सामना वाचवण्यासाठी शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्यांनी १९८२मध्ये अशीच खेळी केली आणि १९८६ मध्ये शतक करत भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात इंग्लंडने २९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिलीप वेंगसरकर यांनी नाबाद १२६ धावा करत संघाला ३४१च्या धावसंख्येवर पोहोचवले. दुसऱ्या डावात कपिल यांचे चार बळी, या कामगिरीमुळे इंग्लंडला फक्त १८० धावा करता आल्या. त्यानंतर भारताने पाच गडी राखून विजय मिळवला.

हेडिंग्ले १९८६

दिलीप वेंगसरकर यांची परदेशात आणि विशेषत: इंग्लंडमध्ये कशी फलंदाजी बहरते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी या सामन्यातही पहिल्या डावात ६१ आणि दुसऱ्या डावात १०२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. पहिल्या डावात भारताने २७२ धावा आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या, तर इंग्लंडचा संघ फक्त १०२ आणि दुसऱ्या डावात १२८ धावाच करू शकला. वेंगसरकर यांच्यासोबत रॉजर बिन्नी यांनीही पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात २ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि भारताला २७९ धावांनी विजय मिळवून दिला होता.

हेडिंग्ले २००२

या सामन्यात संघ प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करून मैदानात उतरला. त्यावेळी संघ दोन फिरकीपटूंसह खेळत होता. सलामीवीर संजय बांगरचे अर्धशतक, राहुल द्रविड याच्या १४८ धावा, सचिन तेंडुलकर याच्या १९३ आणि कर्णधार सौरव गांगुलीच्या १२८ धावा यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी ८ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला.

त्यानंतर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी कमाल दाखवली आणि इंग्लंडच्या संघाला २७३ धावातच गुंडाळले. फॉलोऑन मिळाल्यावरदेखील इंग्लंडचा संघ ३०९ धावाच करू शकला. दुसऱ्या डावातदेखील अनिल कुंबळे याने चार बळी घेतले. त्यामुळे भारतीय संघाला आपण परदेशातदेखील विजय मिळवू शकतो, असा विश्वास मिळाला.

ट्रेंट ब्रिज २००७

हा तोच सामना ज्यात राहुल द्रविडसोबत जेली बिन्सचा किस्सा घडला होता आणि हा तोच सामना ज्यात जहीर खान याने आपल्या स्वॅगने इंग्लंडच्या फलंदाजांना दाखवून दिले होते, की इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर भारतीय जलदगती गोलंदाजांनादेखील स्विंग करता येते आणि यशदेखील मिळवता येते. पहिल्या डावात इंग्लंडचे चार फलंदाज गारद करत जहीरने आपला स्वॅग दाखवला होता, तर इंग्लंडचा डाव १९८ धावात गुंडाळला गेला. मग भारतीय फलंदाजांना शतकी खेळी करता आली नसली तरी सामूहिक प्रयत्न काय असतात, हे त्यांनी दाखवून दिले. दिनेश कार्तिक, वसीम जाफर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीहीएस लक्ष्मण यांनी अर्धशतके करून भारताला ४८१ धावा करून दिल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात ३५५ धावा केल्या खऱ्या, पण त्यामुळे भारताला फक्त ७३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. तीन बळींच्या मोदबल्यात भारताने हे लक्ष्य पूर्ण करून विजय मिळवला. याचा खरा हिरो ठरला तो जहीर. त्याने दुसऱ्या डावातदेखील पाच बळी घेतले होते.