शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

हे बहुमताचं सरकार, शिल्लक आमदार टिकविण्यासाठी सरकार पडण्याची हूल; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 22:59 IST

जनतेचे प्रेम पाहून आम्हाला काम करण्याची ऊर्जा प्रेरणा मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य.

भूपेंद्र मराठेजळगाव : "जनतेचे प्रेम पाहून आम्हाला काम करण्याची ऊर्जा प्रेरणा मिळते, काही लोकं म्हणतात सरकार पडणार. पण हे बहुमताचे सरकार आहे. आपल्याकडील आमदार टिकून रहावेत, यासाठी विरोधकांकडून अशी हूल उठविली जात आहे," असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना हाणला आहे. तुम्ही जितके आरोप कराल त्याच्या दुप्पट आम्ही काम करू असं वक्तव्यही त्यांनी केलं.

पारोळा येथील एनईएस हायस्कूलच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित जाहीर सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला आणि आपल्या सरकारच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले की, "सरकार सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आनंद देणारे असावे. हे काम आपण करतोय, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी असा कोणताही घटक आम्ही वंचित ठेवणार नाही. हे लोकांच्या मनातलं, लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारे सरकार आहेआम्ही लोकांसाठी काम करत असतो. लोकांना वाटतं हे सरकार आपलं आहे, मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री आपले आहेत. या ठिकाणी असलेली गर्दी हीच कामाची पोचपावती आहे." "पुढील काळातही सरकार सकारात्मक निर्णय घेईल," असा विश्वास देत ते म्हणाले की, "उपमुख्यमंत्री यापूर्वी मुख्यमंत्री होते, त्यांच्याही अनुभवाचा फायदा सरकारला होत आहे. कापसासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु. कापसाला जो भाव मिळाला पाहिजे, त्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल.  आपलं सरकार येऊन सहा सात महिने झाले. अस्तित्वाची लढाई सुरू होते तेव्हा वैयक्तिक स्वार्थ बाजूला पडतो. म्हणून आम्ही क्रांती घडवली, उठाव केला. बाळासाहेबांची शिवसेना रक्ताचे पाणी करून उभी केली आहे," असं ते म्हणाले. खोके दिले पण जनतेसाठी लोक आरोप करतात, त्यांच्याकडे दुसरा शब्द नाही. गुलाबराव पाटील यांना आपण आज २०० तर चिमणराव यांना ११५ खोके दिले. पण ते घरात ठेवण्यासाठी नाही तर जनतेसाठी, जनतेच्या कामांसाठी दिल्याचे ते म्हणाले.  यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बॅंक संचालक अमोल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगाव