शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयातील तिसरी शीतपेटीही पडली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 12:39 IST

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - जिल्हा रुग्णालयात मृतहेद ठेवण्यासाठी असलेल्या तीन शीतपेट्यांपैकी (कोल्डस्टोरेज) सुरू असलेली एकमेव शीतपेटीही चार दिवसांपासून बंद पडल्यामुळे शवविच्छेदनासाठी आणलेले मृतहेद उघड्यावर ठेवावे लागत आहे. यामुळे मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयातच घडत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज चार-पाच मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. तसेच बेवारस सापडलेल्या मृतदेहाची ...

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - जिल्हा रुग्णालयात मृतहेद ठेवण्यासाठी असलेल्या तीन शीतपेट्यांपैकी (कोल्डस्टोरेज) सुरू असलेली एकमेव शीतपेटीही चार दिवसांपासून बंद पडल्यामुळे शवविच्छेदनासाठी आणलेले मृतहेद उघड्यावर ठेवावे लागत आहे. यामुळे मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयातच घडत आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज चार-पाच मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. तसेच बेवारस सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तीन दिवसांपर्यत मृतदेह याठिकाणी ठेवावे लागतात. त्यासाठी शवविच्छेदनगृहात तीन शीतपेट्या बसविण्यात आल्या. यातील दोन कोल्डस्टोरेज मशिन गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. त्यात आता तिसरे मशिनदेखील बंद पडले आहे. यामुळे या परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. या संदर्भात शवविच्छेदनासाठी आणलेले मृतदेह शवविच्छेदनगृहात उघड्यावर ठेवावे लागत असल्याची माहिती शवविच्छेदनगृहातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळविली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जात आहे.बंद पडलेल्या मशिन दुरुस्ती करण्यासाठी संबंधित कंपनीसोबत देखभाल दुरुस्तीसाठी करार करण्यात आलेला आहे. मात्र कंपनीकडून गेल्या तीन वर्षात मशिनची देखभाल दुरुस्ती झालेली नसल्याने अडचणी वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शवविच्छेदन गृहातील मशिन दुरुस्तीकरण्यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून पत्र देण्यात आलेले आहेत. संबंधित कंपनीतील कर्मचारी मशिनची तपासणी करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून मशिनची तपासणी केली असता यातील गॅस संपलेला असल्याचे सांगीतले होते. परंतू अद्यापदेखील या मशिनमध्ये गॅस भरलेला नसल्याने या मशिन बंद स्वरुपात असल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासन व कंपनीकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव