जळगाव : धरणगाव तालुक्यातील साळवा या मुळगावी गेले असताना मेस चालक विवेक किशोर नारखेडे यांच्या जुनी भूषण कॉलनीतील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत १९ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी १०़३० वाजता उघडकीस आली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़विद्यार्थ्यांना सुटी असल्यामुळे नारखेडे यांनी काही दिवस मेस बंद ठेवली होती़ ते कुटुंबीयांसह १२ जूनला दुपारी १२ वाजता घराला कुलूप लाऊन साळवा येथे गेले़ चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ त्यानंतर कपाट फोडून त्यातील ७ ग्रॅम सोन्याचा तुकडा व ४ हजार रूपयांची रोकड असा १९ हजार रूपयांचा ऐवज लांबविला़गावावरुन घरी परल्यावर पहिल्या खोलीत सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसून आला़ त्यानंतर मधल्या खोलीत देखील सामान फेकलेला आणि कपाट फोडलेले होते़ तर कपाटातील पैसे व सोन्याचा तुकडा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले़ रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली़ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जळगावातील खानावळ चालकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:41 IST
जळगाव : धरणगाव तालुक्यातील साळवा या मुळगावी गेले असताना मेस चालक विवेक किशोर नारखेडे यांच्या जुनी भूषण कॉलनीतील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत १९ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी १०़३० वाजता उघडकीस आली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़विद्यार्थ्यांना सुटी असल्यामुळे नारखेडे ...
जळगावातील खानावळ चालकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला
ठळक मुद्देजुनी भूषण कॉलनीतील घटना१९ हजारांचा ऐवज लंपासखानावळ चालक गेले होते आपल्या मुळ गावी