शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात उकाड्यामुळे दरवाजा उघडा ठेवल्याने चोरट्यांनी साधली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 16:01 IST

रात्री प्रचंड उकाडा होत असल्याने हवा येण्यासाठी दरवाजा उघडा ठेऊन झोपणे गजानन भिका लोहार (वय ४३, रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव) यांना चांगलेच महागात पडले आहे. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व ३ हजार रुपये ठेवलेली पर्स लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्दे  तीन मोबाईल व ३ हजार रुपये लांबविले शिवाजी नगर हुडकोतील घटना शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१ : रात्री प्रचंड उकाडा होत असल्याने हवा येण्यासाठी दरवाजा उघडा ठेऊन झोपणे गजानन भिका लोहार (वय ४३, रा.हुडको, शिवाजी नगर, जळगाव) यांना चांगलेच महागात पडले आहे. दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल व ३ हजार रुपये ठेवलेली पर्स लांबविल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी नगरातील हुडकोमधील ज्ञानेश्वरी बिल्डींगमध्ये गजानन भिका लोहार हे पत्नी, आई व मुलांसह वास्तव्याला आहेत. तर भाऊ प्रवीण लोहार हे देखील समोरच राहतात. शनिवारी गजानन यांनी भाऊ व त्याच्या परिवाराला घरी जेवायला बोलावले होते. जेवण झाल्यानंतर भाऊ रात्री साडे दहा वाजता त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर मुख्य दरवाजा बंद करुन हवा येण्यासाठी अन्य दोन दरवाजे उघडे ठेवून घरातील सर्व जण झोपून गेले. मुलाने मोबाईल मागितल्यावर उघड झाली घटनासकाळी साडे सहा वाजता उठल्यावर मुलगा मयुर याने खेळण्यासाठी मोबाईल मागितला असता जागेवर मोबाईल नव्हता. काचेच्या शोकेसवर हा मोबाईल चार्जिंगला लावलेला होता, त्याशिवाय अन्य दोन मोबाईलही ठेवलेले होते. त्यापैकी एकही मोबाईल जागेवर नव्हता तर पत्नीची पर्स देखील गायब झालेली होती. या पर्समध्ये तीन हजार रुपये ठेवलेले होते. आठ हजार रुपये किमतीचा एक, दुसरा सहा हजार तर तिसरा पाचशे रुपये किमतीचा असे तीन मोबाईल व रोख रक्कम १८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा