शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
3
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
4
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
5
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
6
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
7
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
8
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
9
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
10
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
11
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
12
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
13
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
14
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
15
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
16
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
17
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
18
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
19
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
20
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

यमुना नगरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 3:41 PM

४४ हजारांचा ऐवज लंपास : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव- वडीलांच्या निधनानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेलापूर बुद्रूक या मुळगावी थांबलेल्या यमुनानगरातील लेणेकर दाम्पत्याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत ४४ हजार ३०० रूपयांच्या ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी घरमालक संजय निनाजी लेणेकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़संजय लेणेकर हे अयोध्यानगर परिसरातील यमुनानगरात पत्नी आशा यांच्यासाहेबत वास्तव्यास आहेत़ एमआयडीसी परिसरातील बॅन्जो केम़ इंडस्ट्रिज प्रा़लि़ कंपनीत ते काम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात़ दरम्यान, वडील निनाजी लेणेकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे संजय हे १६ जानेवारी रोजी पत्नीसह बुलढाणा येथे गेले होते़ त्यामुळे त्यांचे कुलूप बंद होते़ दुसऱ्या दिवशी १७ रोजी वडीलांचे निधन झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लेणेकर दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील शेलापूर बुद्रूक या मुळगावी गेले होते़ त्यानंतर तेथेच थांबले़अन् चोरट्यांनी मारला डल्लापाच ते सहा दिवसांपासून घर कुलूप बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी लेणेकर दाम्पत्याच्या यमुनानगरातील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली़ दरम्यान, २५ जानेवारी रोजी शेजारी राहणारी महिला सीमा सरोदे यांना लेणेकर यांचे घर उघडे दिसल्याने त्यांनी त्वरित आशा लेणेकर यांना संपर्क साधून आपण घरी आला आहात का? अशी विचारणा करीत घर उघडे असल्याचे सांगितले़ मात्र, आम्ही घरी नसल्याचे सांगितल्यानंतर घरात चोरी झाल्याचे सरोदे यांच्या पाहणीत आढळून आले़ यावेळी चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता़दागिन्यांसह रोकडवर हात साफ२५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता लेणेकर दाम्पत्य यमुनानगरातील राहत्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांना सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले़ त्यातच कपाट फोडलेले व त्यातील ६ हजार रूपये किंमतीची दोन ग्रँम वजनाची चैन, ९ हजार रूपये किंमतीच्या तीन ग्रँम वजनाच्या सोन्याच्या फुल्या तसेच १ हजार रूपये किंमतीचे दोन भार वजनाचे दाने चांदीच्या अंगठ्या, १ हजार रूपये किंमतीची दोन भार वजनाची चांदीची चैन, ७०० रूपये किंमतीची बेंटेक्सची चेन व पेंडल, ६०० रूपये किंमतीच्या बेंटेंक्सच्या बांगड्या, १ हजार रूपये किंमतीचा स्पीकर तसेच २५ हजार रूपयांची रोकड असा एकूण ४४ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले़शुक्रवारी दिली फिर्याददरम्यान, वडीलांच्या दशक्रियेचा कार्यक्रम मुळगावी असल्यामुळे लेणेकर दाम्पत्य हे शेलापूर बुदू्रक येथे पुन्हा निघून गेले़ त्यानंतर शुक्रवारी घरी आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून घरात चोरी झाल्याची माहिती कळविली़ त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव