शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:23 IST

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३४ ग्रॅम सोने, ४० भार चांदी असा दीड लाख रुपयांचा ऐवज तर त्यांच्याच शेजारी राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याही घरातूनही चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिव कॉलनीत उघडकीस आली.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी दोन ठिकाणी घरफोड्यासोने-चांदीसह दीड लाखाचा ऐवज लंपासदेवदर्शनासाठी गेले अन् चोरट्यांनी संधी साधलीदरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडला

जळगाव : पोळा सणानिमित्त गाढोदा (ता.जळगाव) येथे मूळ गावी गेलेले दिनकर गोरख पाटील (वय ४५) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३४ ग्रॅम सोने, ४० भार चांदी असा दीड लाख रुपयांचा ऐवज तर त्यांच्याच शेजारी राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याही घरातूनही चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिव कॉलनीत उघडकीस आली. दिनकर पाटील हे बाहेती विद्यालयात शिक्षक आहेत.शिव कॉलनीतील गट क्र.५४ मध्ये आनंद उद्योगजवळ दिनकर पाटील हे पत्नी रेखा, मुलगा यश, मुलगी तेजश्री व यशश्री यांच्यासह वास्तव्याला आहेत.रविवारी पोळा सण असल्याने पाटील कुटुंब शनिवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गाढोदा गेले होते. ही घटना रविवारी सकाळी घराशेजारी राहणारे डी. पी. सरोदे यांच्या लक्षात आली.३४ ग्रॅम सोन्याचे दागिने गायबसोन्याच्या साखळ्या, टोंगल, अंगठी, करदोडा असे ३४ ग्रॅम सोने व ४० भार चांदीचे दागिने गायब झालेले होते. त्यांनी लागलीच रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून चोरीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी सहकाºयांना घटनास्थळी रवाना केले तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वान गल्लीत घुटमळले तर ठशांचे नमुने घेण्यात आले. दरम्यान,दिनकर पाटील यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे.दिनकर पाटील यांच्या शेजारीच राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याकडेही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून चांदीचे दागिने लांबविण्यात आले आहेत. चव्हाण हे पत्नी सुवर्णा यांच्यासह अहमदाबाद, सोमनाथ व पावागड येथे देवदर्शनाला गेले आहेत. शनिवारीच ते रवाना झाले आणि रात्री त्यांच्याकडे घरफोडी झाली. चोरट्यांनी नेमके काय लांबविले आहे, हे ते परत आल्यावरच स्पष्ट होईल. चव्हाण हे एस.टी वर्कशॉप येथे नोकरीला आहेत.घरात चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तासाभरात दिनकर पाटील यांनी शिव कॉलनीतील घर गाठले. मुख्य दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला होता. घरातील सामान अस्ताव्यस्त होता तर शेवटच्या खोलीत कपाट उघडे होते. चोरट्यांनी प्रत्येक खोलीत सामानाची नासधूस केलेली होती.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी