शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

चोरीचा ऐवज चोरानेच केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 22:41 IST

न्हावेची घटना : कारवाई होण्याच्या भीतीने दागिने आणि रोकड गुपचूप आणून टाकली घरात

चाळीसगाव : चोराने एखाद्या घरात चोरी केली आणि चोरलेला किंमती ऐवज परत केल्याचे आतापर्यंत कधी ऐकले नाही. मात्र चाळीसगाव तालुक्यात अशी घटनाघडली आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने अ‍ॅल्युमिनीयमच्या डब्यात ठेवलेले दोन लाख ८२ हजार रुपए किंमतीचे सोन्याचे दागिने घराचे कुलूप तोडून लंपास केल्याची घटना तालुक्यातील न्हावे येथे घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांनाच चोरलेली रोकड व सोन्या चांदीचे दागिने असलेली पिशवी ज्या घरातून चोरी केली होती त्याच घराच्या दरवाजाजवळ आणून टाकल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी हे दागिणे व रोकड संबंधीत महिलेला परत केली आहे.या घटनेची माहिती अशी की, न्हावे येथील पुष्पाबाई संभाजी पाटील या १६ रोजी सायंकाळी चाळीसगाव येथे आल्या. त्या रात्रभर चाळीसगाव येथेच मुक्कामी होत्या. दुसऱ्या दिवशी १७ रोजी सकाळी त्या आपल्या गावी गेल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले व मधल्या खोलीतील लोखंडी भांडे ठेवण्याचे रॅकमध्ये ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या डब्यातील १५ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८२ हजार ५०० रुपए किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी पुष्पाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु असतांनाच २० रोजी कोणीतरी अज्ञात चोराने पैसे व सोन्याचे दागिणे असलेली एक प्लास्टीकची पिशवी घरासमोर टाकून दिली. ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांचे पथकाने न्हावे येथे जावून पंचांसमक्ष ते दागिणे व रोकड असलेली पिशवी जप्त केली. त्यानंतर ते संबंधीत महिलेला पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले.पोलिसांचे पथक याबाबत सखोल तपास करीत असतांनाच न्हावे गावातीलच काहींनी ही चोरी केली असल्याच ेत्यांच्या नजरेस आले. पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यातही घेतले होते. पोलीस त्याच्या पर्यंत पोहचतील अशी भिती बहुदा चोरट्याला वाटली असावी आणि कारवाईच्या भितीने त्याने हे चोरलेले रोकड व दागिने परत केले असावे, असा अंदाज आहे.