शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधीतांविषयी अद्यापही भेदभाव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 12:02 IST

मुलांना सकस आहार, शिक्षण मिळण्याची अपेक्षा

ठळक मुद्देशोकांतिका मानसिक खच्चीकरणामुळे रुग्ण व्यसनाधीन

जळगाव : रुग्ण व समाजात एचआयव्हीबाबत गैरसमज आहे. या आजाराबाबत कुणालाही माहिती समजू नये म्हणून काही रुग्ण उपचारही घेत नाही. परिणामी अनेक रुग्ण या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. एखाद्या रुग्णाची ओळख स्पष्ट झाल्यावर समाजाकडून देण्यात येणारी हीन वागणूक व मानसिक खच्चीकरण होत असल्याने रुग्णांबाबत हा भेदभाव दूर होणे आवश्यक असल्याचे सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. एचआयव्ही बाधीत मुलांमध्ये भेदभाव न करता त्यांना शिक्षण द्यावे तसेच आवश्यक सकस आहारही दिला जावा, असेही आवाहन जागतिक एडस् दिनानिमित्त करण्यात येत आहे.एचआयव्हीग्रस्तांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी निकषात बदल व्हावाएचआयव्ही संसर्गित व्यक्ती शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहत असून त्यांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र असो वा इतर निकष यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एचआयव्ही बाधीत रुग्ण असून त्यांना शासनाच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र योजनांमधील निकषामुळे ते यापासून वंचित राहत आहे. निकषात बदल करावा, जेणेकरून दुर्धर आजार असलेल्या गरीब गरजू व निराधार व्यक्तींना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणे सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मानसिक खच्चीकरणामुळे रुग्ण व्यसनाधीनएखाद्या रुग्णाची ओळख स्पष्ट झाल्यावर समाजाकडून देण्यात येणारी हीन वागणूक व मानसिक खच्चीकरण होत असल्याने रुग्ण व्यसानाधिनतेकडे व आत्महत्यांसारखे पाऊल उचलतात. हे टाळण्यासाठी या रुग्णांबाबत मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामध्ये होत असलेल्या जनजागृती व उपचार पद्धतीयामुळे संख्या घटत असल्याचेही सकारात्मक चित्र आहे.एचआयव्ही बाधीतांबाबत जनजागृती वाढत असल्याचे सकारात्मक चित्र असले तरी दुसरीकडे अद्यापही भेदभाव होताना दिसतो. एचआयव्ही बाधीत मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये व त्यांना पुरेसा सकस आहार मिळणे गरजेचे आहे. तसेच योजनांचाही लाभ या रुग्णांना मिळावा.- अनिता पाटील, अध्यक्षा, पॉझिटिव्ह पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही नेटवर्क आॅफ जळगाव.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव