शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्यांचे कौतुक नाही, अन् कामचुकारांना धाक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 13:02 IST

हितेंद्र काळुंखेकौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.जिल्हा परिषदेत हे खराब चित्र पहायला मिळत आहे. ग्रामसेवकांना दिला जाणारा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुुरस्कार हा गेल्या तीन वर्षांपासून ...

हितेंद्र काळुंखेकौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.जिल्हा परिषदेत हे खराब चित्र पहायला मिळत आहे. ग्रामसेवकांना दिला जाणारा ‘आदर्श ग्रामसेवक’ पुुरस्कार हा गेल्या तीन वर्षांपासून जाहीर झालेला नाही. यामुळे ग्रामसेवकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असतानाही याची दखल घेण्यास संबंधित अधिकारी तयार नाही. ही एक प्रकारे मनमानीच म्हणावी लागेल.यामुळे ग्रामसेवकांमध्ये निराशाही निर्माण झाली आहे. ग्रामसेवक हा ग्रामीण भागातील विकासाच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक आहे. यापैकी काही ग्रामसेवक हे भ्रष्टाचार, गैरकारभार, अकार्यक्षमता आदीमुळे विकासाऐवजी गाव भकास करण्याचे काम करत असताना काही ग्रामसेवक हे खरोखर चांगले काम करणारेही आहेत. अशा ग्रामसेवकांच्या कामाचे कौतुक होणे गरजेचे आहे. यासाठी ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ सारखी योजना असतानाही ही योजनाच जळगाव जिल्हा परिषदेने गुंडाळल्यासारखी स्थिती आहे.याबाबत ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे यांच्याकडे हा प्रश्न केला असता डिसेंबर १७ च्या आत तिन्ही वर्षाचे पुरस्कार जाहीर केले जातील असे जाहीर केले होते. परंतु डिसेंबर उलटून साडेतीन महिने झाले तरीही काहीच हालचाली झाल्या नाहीत. दरम्यान गेल्या सर्वसाधारण सभेतही हा प्रश्न उपस्थित झाला असतानाही बोटे यांनी लवकरच पुरस्कार जाहीर करु, असे सांगितले परंतु महिना उलटला तरीही काहीच हालचाल झालेली दिसत नाही.एकीकडे चांगल्या ग्रामसेवकांना प्रोत्साहन दिले जात नसताना दुसरीकडे कामचुकार आणि भ्रष्ट ग्रामसेवकांवर कारवाईसाठीही सरपंच, ग्राम पंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांना न्यायासाठी झगडावे लागत आहे. तरीही न्याय मिळत नसल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. अशा ग्रामसेवकांवरही कडक कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र चांगल्यांचे कौतुक होत नाही, अन् कामचुकारांनाही धाक राहिला नाही...अशी स्थिती निर्माण झाली आहे, असेच एकूण स्थितीबद्दल म्हणात येईल. यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदJalgaonजळगाव