शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या घर परिसरात मतदानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:36 IST

३३ केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी शिक्षित परिसरात मतदानाची टक्केवारी झोपडपट्टी भागापेक्षा कमी असल्याचे आकडेवारीवरून समोर आले असून शहरातील ३३ मतदान केंद्रांवर ४० टक्केच्या आत मतदान झाले असून यात आमदार सुरेश भोळे यांच्या निवासस्थान परिसरातील चार मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्वाधिक ७०.९८ टक्के मतदान कंवरनगर मेहरुणमधील २७६ क्रमांकाच्या मतदान केंद्रात झाले आहे तर सर्वात कमी १९.९० टक्के मतदान सुयोग कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळील मतदान केंद्र क्रमांक २९९वर झाले आहे.मतदानाची आकडेवारी पाहता शिक्षित भागातील मतदानाचा टक्का हा झोपडपट्टी भागापेक्षा कमी असल्याचे दिसून येते.कमी टक्केवारी असलेले मतदान केंद्रसुयोग कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळील मतदान केंद्र क्रमांक २९९वर १९.९० टक्के, रिंग रोडवरील स्टेट बँकेजवळील मतदान केंद्र क्रमांक २०२ वर - २६ टक्के, पोलीस मुख्यालयाजवळील मतदान केंद्र क्रमांक २२९ - २६.२० टक्के, सिंधी कॉलनीजवळील मतदान केंद्र क्रमांक २५३ - २९.११ टक्के, पोलीस मुख्यालयाजवळील मतदान केंद्र क्रमांक २२८ - २९.२१ टक्के, ख्वाजा मिया चौकाजवळील मॉडर्न गर्ल्स स्कूल मतदान केंद्र क्रमांक २०० - २९.७० टक्के, आर.आर. विद्यालय मतदान केंद्र क्रमांक २०४ - ३०.७२ टक्के, मू.जे. महाविद्यालय मतदान केंद्र क्रमांक २३३ - ३१.०४ टक्के, महाबळ रोड मेहरुण मतदान केंद्र क्रमांक ३५२ - ३३.८१ टक्के, आर.आर. विद्यालय मतदान केंद्र क्रमांक २०५ - ३४.१२ टक्के, मतदान केंद्र क्रमांक २०७ - ३४.३८ टक्के, शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २८९ - ३५.१७ टक्के, आयोध्यानगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २१८ - ३५.३६ टक्के, ख्वाजामिया चौक मतदान केंद्र क्रमांक १८९ - ३५.४५ टक्के, शिवकॉलनी मतदान केंद्र क्रमांक १८३ - ३७.२७ टक्के, गेंदालाल मिल मतदान केंद्र क्रमांक २३ - ३७.३६ टक्के,शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २८६ ए - ३७.५७ टक्के, निमखेडी परिसर मतदान केंद्र क्रमांक १२ - ३७.६८, शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २८७ - ३८.१२, मतदान केंद्र क्रमांक २८८-३८.३९टक्के, ख्वाजामिया चौक मतदान केंद्र क्रमांक १९० - ३८.२६ टक्के, शिवकॉलनी मतदान केंद्र क्रमांक १७९ - ३८.५६ टक्के, भिलपुरा चौक मतदान केंद्र क्रमांक ११२ - ३८.५७ टक्के, महाबळ रोड मेहरुण मतदान केंद्र क्रमांक ३५९ - ३९.१० टक्के, पिंप्राळा मतदान केंद्र क्रमांक १४७ - ३९.२२, मतदान केंद्र क्रमांक ३४५- ३९.२६ टक्के, आयोध्यानगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २१६ - ३९.३६ टक्के, शिवकॉलनी मतदान केंद्र क्रमांक १७६ - ३९.३६ टक्के, शिवराम नगर मतदान केंद्र क्रमांक २९२ - ३९.३७, गेंदालाल मिल मतदान केंद्र क्रमांक ३१ ३९.४४ टक्के, आदर्शनगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक ३३२ - ३९.४८ टक्के, गणपतीनगर मतदान केंद्र क्रमांक २८४ - ३९.४९ टक्के, मू.जे. महाविद्यालयजवळ मतदान केंद्र क्रमांक २३४ - ३९.६५ टक्के.५५ टक्केपेक्षा जास्त टक्केवारी असलेले मतदान केंद्रकंवरनगर मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २७६ - ७०.९८ टक्के, भिलपुरा पोलीस चौकी मतदान केंद्र क्रमांक १२४ - ६९.०५ टक्के, सुयोग कॉलनीतील साईबाबा मंदिराजवळील मतदान केंद्र क्रमांक २९९ ए - ६८.३४ टक्के, चौबे शाळा मतदान केंद्र क्रमांक ६५ - ६४.५६ टक्के, सिंधी कॉलनी मतदान केंद्र क्रमांक २७९ - ६३.६४ टक्के, चौबे शाळा मतदान केंद्र क्रमांक ६३ - ६३.४३ टक्के, भिलपुरा मतदान केंद्र क्रमांक - १११ - ६३.१९ टक्के, ढाकेवाडी केंद्र क्रमांक १९७ - ६३.०८ टक्के, गणेशपुरी मेहरुण मतदान केंद्र क्रमांक २७१ - ६३.०९ टक्के.

टॅग्स :Jalgaonजळगाव