शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे बोरी पात्रावर पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:03 IST

अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात बोरी पात्राजवळ काहींनी अतिक्रमित जागी बेकायदा विहिरी खोदून दुष्काळात पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमित विहिरी खोदून केला जातोय प्रकारशेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

अमळनेर, जि.जळगाव : शहरातील सानेनगर परिसरात बोरी पात्राजवळ काहींनी अतिक्रमित जागी बेकायदा विहिरी खोदून दुष्काळात पाणी विकण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. नाल्याद्वारे वाहून येणारे शहरातील सांडपाणीही बंधा-याद्वारे अडवून विहिरींत टाकले जात आहे. याबाबत नंदगाव, सानेनगर, तांबेपुरा व अमळनेर परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.या निवेदनात नमूद केल्यानुसार, सानेनगरपुढील बोरी नदीपात्र ते नंदगाव व ठाकूरसिंहजी मानव केंद्रामागील नदीकाठच्या (किनारपट्टी) भागात काही पाणीचोरांंनी वैयक्तिक फायद्यासाठी नदीच्या किनारपट्टीवर बेकायदा अतिक्रमण करून विहिरी खोदल्या आहेत.या पाण्याचा उपयोग ते शेतीसाठी तसेच विक्रीसाठी करतात. नदी, नाला व शहरातून वाहून येणारे सांडपाणीदेखील वळसा, बंधारा याद्वारे अडवून बेकायदेशीरपणे खोदलेल्या अतिक्रमित विहिरींमध्ये टाकले जात आहे. या विहिरींतील पाणी मोटारींच्या साह्याने पाइपलाइनद्वारे विकले जात आहे. यासाठी कुठलीही शासकीय परवानगी न घेता रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यामुळे परिसरातील सर्व विहिरी व बोअर कोरडे पडले असून, पशुधनासाठी पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी चोरी करणारांना शेतकºयांनी मज्जाव केला असता त्यांना ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याचे परिसरातील शेतकºयांनी सांगितले.निवेदनावर हिरालाल पाटील, हिंमत वामन पवार, गणेश पाटील, पीयूष शर्मा, संतोष पाटील, योगेश पाटील, सदाशिव पाटील, विनायक पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, भास्कर पाटील, खुशाल पाटील, जगदीश पाटील, अनिल पाटील, प्रवीण पाटील, दीपक पाटील आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईAmalnerअमळनेर