पारोळा येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बापू तुकाराम महाजन (व्यंकटेश नगर, ता. पारोळा) यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच१९/डीएम६२२०) ही नेहमीप्रमाणे २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी अंगणात लावून घरी गेले असता पहाटे उठल्यावर बघितले तर अंगणात मोटरसायकल दिसली नाही. याबाबत परिसरात शोधाशोध करूनदेखील मोटरसायकल मिळाली नाही. म्हणून त्यांनी पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मागील काळात पारोळा शहरात मोटरसायकल चोऱ्या वाढल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा हा ग्रामीण भागाकडे वळवला होता. आता काही दिवसात पुन्हा शहराकडे या चोरट्यांचा मोर्चा आला आहे. त्यात सामान्य माणूसच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्याही मोटरसायकली चोरीस जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांचे आत्मबळ वाढले व नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.