छाजेड यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दुकानात दोन वर्कर व तीन हमाल असे एकूण पाच लोक कामाला आहेत. सोमवारी (दि. ९) सायंकाळी ६.३० वा.चे सुमारास नेहमीप्रमाणे बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स दुकान बंद करून घरी गेलो व मंगळवारी (दि.१०) सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानातील हमाल अरुण गुमान बारेला याने दुकानाचे कंपाउंडचे मेनगेट उघडे आहे व मधे ठेवलेली लोखंडी आसारी दिसत नाही. याबाबत दुकानात काम करणारे राजेंद्र रघुनाथ पाटील, सुरेश युवराज कोळी, आकाश भामा बारेला, संदीप जमादा बारेला यांना लागलीच फोन करून याठिकाणी बोलावून याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडून उपयुक्त माहिती मिळाली नाही.
अज्ञात चोरट्याने आसाऱ्या चोरून नेल्या आहेत
७७ हजार ६१६ किमतीचे ८ मिमी लोखंडी आसारी १७ भारी प्रती ८१.५०० किलो वजनाच्या एक हजार ३८६ किलो वजनाची, तर ८८ हजार २५६ किमतीची १० मिमी लोखंडी आसारी २० भारी प्रती ७८.८०० किलोप्रमाणे एक हजार ५७६ किलो वजनाची आणि चार हजार १२८ किमतीची १२ मिमी लोखंडी आसारी १ भारी प्रती ७३.८०० किलो वजनाची असे एकूण एक लाख ७० हजार रुपये किमतीचे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.
तपास चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शेषराव तोरे करीत आहेत.
120821\12jal_1_12082021_12.jpg
धरणगाव रोडलगत दुकानावरील पावणे दोन लाखांच्या आसारीची चोरी