शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बंद घरातून साडेआठ लाखांच्या वस्तुंची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 19:13 IST

चाळीसगाव : मनिषा महाजन यांची तक्रार

चाळीसगाव : ताबेगहाण बंद घरातून घर मालक मुकूंद कोठावदे यांच्यासह कुटुंबियातील सदस्यांनी ८ लाख ७९ हजार २५० रुपये किंमतीच्या संसार पयोगी सामानासह फर्निचर, सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार मनिषा सोनू महाजन यांनी पोलीसात केली.माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर २ जून २०१६ रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यावेळी त्यांनी आपल्या ताबेगहाण असलेल्या घराला कुलूप लावले होते.हल्ला झाल्यामुळे घरबंद स्थितीत होते. दहशतीमुळे त्यांनी सदरील घर उघडले नाही. ८ रोजी तपासअधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासमवेत स्पॉट पंचनामासाठी गेलो असता ही बाब उघडकीस आली.घटनास्थळी मुकूंद कोठावदे यांनी पोलिसांसमोर त्यांच्याजवळ असलेल्या चावीने घर उघडले. घरात प्रवेश केला असता त्यात आमची एकही वस्तू घरात दिसून आली नाही. या सर्व वस्तू २ जून २०१६ ते ८ मे २०१९ च्या दरम्यान घर मालक मुकूंद कोठावदे, भावेश कोठावदे व इतर सदस्यांनी माझ्या घराचे कुलूप तोडून अनाधिकृत प्रवेश करुन नमूद केलेले साहित्य चोरुन नेले आहे. असे तक्रारीत महाजन यांनी म्हटले आहे. संबंधितांविरुध्द भादंवि.कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. घरातील फर्निचर, संसार उपयोगी वस्तु व सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या त्यांनी सोबत जोडल्या आहेत.तक्रारीच्या प्रती पोलीस अधीक्षक जळगाव,अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव व पोलीस उपअधीक्षक चाळीसगाव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.