शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर परिसरातील मंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:38 IST

गुन्हा दाखल : आतापर्यंत पाच वेळा चोरी

जळगाव : शिवाजीनगर परिसरातील शांतीनाथ डिगंबर जैन मंदिरात सलग दोन दिवस चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला आहे. या मंदिरात चोरट्यांनी दोन दिवसात मंदिरातील तांब्याचे ४००कलश व एक पितळी समई असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. दरम्यान यापूर्वी या मंदिरात तीन वेळा चोरीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजीनगर परिसरातील शांतीनाथ डिगंबर जैन मंदिराचा गाभा बंद आहे. प्रमोद हिरालाल जैन (५५,रा. शिवाजीनगर) हे मंदिराचे पुजारी आहे. तेच फक्त पूजाविधीसाठी मंदिर उघडत असतात. बुधवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास पुजारी जैन यांनी पूजाविधीसाठी मंदिर उघडले असता त्यांना मंदिराच्या गाभा असलेल्या दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर गुरुवारीही सकाळी ५.३० वाजता मंदिर उघडले असता मंदिराच्या सभागृह असलेल्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. सलग दोन दिवसाच्या प्रकारानंतर पुजारी जैन यांनी प्रकार मंदिराच्या ट्रस्टींना ट्रस्टी प्रदिपकुमार सुरेंद्रनाथ जैन व राजेश जैन यांना कळविला. तसेच मंदिरात पाहणी केली असता, मंदिराच्या हॉलमध्ये असलेले १५ हजार रुपये किमतीचे ३०० तांब्याचे कलश तसेच गाभा‍ऱ्यात असलेली एक हजार रुपये किमतची पितळी समई असा ऐवज एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविले असल्याचे समोर आले.सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत कैदप्रदीपकुमार जैन यांनी परिसरातील फुटेज तपासले असता बुधवारी दोन इसम मंदिर परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. तर मध्यरात्री मंदिराजवळ तीन संशयीत इसम फिरत असताना दिसून आले. फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या पूर्वी या मंदिरात तीन वेळी चोरी झाल्याची माहिती प्रदिपकुमार यांनी दिली. याप्रकरणी पुजारी प्रमोद जैन यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विजय निकुंभ करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव