शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘मुख्यमंत्र्यांनी सल्ला न ऐकल्याने शिंदेंच्या गटात’, गुलाबराव पाटील यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 09:32 IST

Gulabrao Patil : राज्यात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे.

जळगाव : राज्यात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फूट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली. मात्र,याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत गुलाबराव पाटील हे मुंबईलाच थांबून होते. मात्र, शिवसेनेकडून शिंदेचे बंड रोखण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते गुवाहाटीला  रवाना झाले. 

फडणवीस, महाजन यांनीही साधला संपर्क मंगळवारी रात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून, त्यांना शिंदे गटात सहभागी होण्याबाबतचा सल्ला दिला. स्वत: गुलाबराव पाटील यांनी देखील त्यास दुजोरा दिला आहे. 

वेगळा गट नाही, आम्ही शिवसेनेत गुलाबराव पाटील यांना आता गट स्थापन होणार की शिवसेनेत राहणार राहणार याबाबत विचारले असता, वेगळा गट स्थापन केला जाणार नसून शिवसेना म्हणूनच आम्ही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात सरकार झाल्यास शिवसेनेचा पाठींबा राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

आ. चंद्रकांत पाटील गुवाहाटीतमुंबईहून रात्री मुक्ताईनगरात दाखल झालेले आ. चंद्रकांत पाटील हे बुधवारी दुपारी लागलीच चॉपर विमानाने मुंबईकडे रवाना झाले. आणि तिथून विमानाने गुवाहाटीला गेले आहेत.  गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घालण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.अपक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार चंद्रकांत पाटील हे बुधवारी मुक्ताईनगरात होते. मात्र अचानक ते जळगाववरुन विमानाने मुंबईला व नंतर गुवाहाटीला रवाना झाले. पाटील यांना खडसेविरोधक म्हणून पाठबळ आहे. मात्र राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना विधान परिषदेवर निवडून आणल्याने राजकीय वाटचाल खडतर होण्यापूर्वी त्यांनी गुवाहाटीचा मार्ग धरल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलShiv Senaशिवसेना