शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

बाप्पा पावला, कापसाला आला १६ हजारांचा भाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:13 IST

cotton Price: जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला. बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. 

जळगाव   : जिल्ह्यात अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना जणू बाप्पाच पावला. बोदवड येथे कापसाला १६ हजार रुपये, तर सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथे १४,७७२ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. पांढऱ्या सोन्याचे नंदनवन असलेल्या बोदवड तालुक्यात बुधवारी कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला. त्यात खरेदीच्या शुभ मुहूर्तावर सोळा हजारांचा भाव देण्यात आल्याने कापसाची यंदाची सुरुवात जोरदार झाली.  वैष्णवी ट्रेडर्सचे संचालक राजू वैष्णव यांनी कापूस खरेदीचा शुभारंभ केला. त्यात १६ हजारांचा भाव मिळाला.सातगाव डोंगरी, ता. पाचोरा येथील व्यापारी बाळू शंकर वाघ आणि ज्ञानेश्वर शंकर अमृतकर यांनी १४ हजार ७७२ रुपये भावाने कापूस खरेदी केला.  पहिल्या दिवशी ६७ किलो कापूस खरेदी झाला. धरणगाव येथे श्री जिनिंगमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली. मुहूर्ताचा भाव यावेळी ११ हजार १५३ रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला.  पहिल्याच दिवशी मुहूर्तावर साधारण एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.  धरणगाव तालुक्यातील जिनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात होत असते. यावेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील,  माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह  जीवनसिंह बयस, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी आदी उपस्थित होते. याशिवाय बाळद, ता. पाचोरा, कासोदा ता. एरंडोल आणि कजगाव, ता. भडगाव येथेही कापूस खरेदी सुरू झाली आहे.असा मिळाला भाव (क्विंटलप्रमाणे)  - बोदवड : १६,००० रुपये - सातगाव डोंगरी  : १४,७७२ रुपये - बाळद : ११,५५१ रुपये- धरणगाव :  ११,१५३ रुपये- कासोदा : ११,०११ रुपये-कजगाव : ११,००० रुपये

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती