शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाच लाखासाठी सोन्याची बाळी काढून घेणारा पोलिस निलंबित

By विजय.सैतवाल | Updated: January 27, 2024 21:14 IST

हद्द नसतानाही कारवाई करत पैशाची केली होती मागणी.

जळगाव : नेमणूक असलेल्या पोलिस ठाण्याची हद्द सोडून कट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेणारे अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची प्राथमिक चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे. याच प्रकरणातील महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी यांचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.

१० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार लक्ष्मण शिंगाणे, पाळधी महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी हे हातेड, ता.चोपडा येथील दोन खासगी पंटरसह चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेले होते. तेथे शुभम प्रकाश सूर्यवंशी (रा. हातकणंगले, ता. कोल्हापूर) यास त्यांनी अडवले.  त्याच्याकडे गावठी कट्टा मिळाल्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली होती. पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने सूर्यवंशीच्या कानातील सोन्याची बाळी या पोलिसांनी काढून घेतली होती. या संपूर्ण प्रकाराचा अहवाल पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर करण्यात आल्यानंतर शिंगाणे यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली व कट्टा बाळगणाऱ्या सूर्यवंशी याच्या कानातून काढून घेतलेली बाळी शिंगाणे यांनी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिली होती.  

या प्रकरणात शिंगाणे यांना निलंबित करण्यात आले असून अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशीदेखील सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, महामार्ग पोलिस चौकीचे कर्मचारी रितेश चौधरी यांचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.

कर्मचारी निलंबितकट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेण्यात आलेल्या प्रकरणात संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. याच प्रकरणातील महामार्ग पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्याचा अहवाल संबंधितांना पाठवण्यात आला आहे.- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, जळगाव. 

टॅग्स :Jalgaonजळगाव