शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोळीबांधवांनी हाती घेतले अन्नत्यागाचे अस्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 19:14 IST

विविध मागण्यांसाठी एकवटले : पाच जणांच्या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंदन पाटील

जळगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोळी समाजातील पाच बांधवांनी मंगळवारी अन्नत्यागाचे अस्त्र हाती घेतले आहे.मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील समाजबांधवांनी सहभाग घेत अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

मंगळवारी सकाळी ११ वाजता जगन्नाथ बाविस्कर, नितीन कांडेलकर, संजय कांडेलकर ,नितीन सपकाळे, पद्माकर कोळी यांनी वाल्मिकनगरातील आराध्य दैवत आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांना वंदन केले. त्यानंतर त्यांनी टॉवर चौक, महापालिका, स्वातंत्र्यचौकमार्गे पायी प्रवास करुन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारलेल्या मंडपात उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हाभरातून आंदोलनस्थळी दाखल झालेल्या जिल्हाभरातील मान्यवरांसह समाजबांधवांनी उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी अनेकांनी मागण्यांविषयी मार्गदर्शन केले आणि शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, असा आग्रह धरला.

आंदोलनस्थळी डॉ.शांताराम सोनवणे, प्रभाकर सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, अरुण इंगळे, डॉ.अश्विन सोनवणे, कैलास सोनवणे, अनील नन्नवरे, मुकेश सोनवणे, योगेश बाविस्कर, मंदा सोनवणे, मंगला कोळी, राहुल सोनवणे, ॲड.अमीत सोनवणे, ॲड.गणेश सोनवणे, संभाजी सोनवणे,संदीप कोळी, मन्नू सोनवणे,  (जळगाव), जितेंद्र सपकाळे, पन्ना कोळी (भुसावळ), अशोक कांडेलकर (मुक्ताईनगर), डी.पी.साळुंखे (चोपडा), टायगर कोळी (जामनेर), हरलाल कोळी (रावेर) आदींनी भेट देत पाठिंबा दिला.

अशा आहेत मागण्याविनाअट आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी ढोर कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत, ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे,  जातपडताळणी समिती जळगाव जिल्हा करिता मंजूर आहे परंतु कार्यालय धुळे येथे आहे. कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे, आदिवासी कोळी समाजाच्या, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र महर्षि वाल्मीक ऋषी यांचे नावे महामंडळ स्थापन करावे, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणी समिती असावी, तथाकथित आदिवासी संघटनांचा हस्तक्षेप थांबवावा, बाहेरील राज्यातील रहिवास्यांच्या जात वैधता रद्द कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरु आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव