शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दस्ताऐवज महिनाभर दडविले, निकृष्ट कामांकडे डोळेझाक!

By सुनील पाटील | Updated: January 6, 2024 15:48 IST

आयुक्तांनी घेतले अभियंत्यांना फैलावर, तीन दिवसात मागितला खुलासा

जळगाव : निविदाधारकांनी आवश्यक असलेली दस्तऐवज निविदेसोबत जोडलेली असतांनादेखील त्यांना दस्तऐवजांची पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले आणि तद्नंतर ही नस्ती सुमारे एक महिना दडवून ठेवत प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रताप एक अभियंत्याने केला तर दुसऱ्याने गटारीच्या निकृष्ट कामांकडे डोळेझाक केली.

महापालिकेला आर्थिक झळ पोहचण्यासह निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रकरणात महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता समीर शशिकांत बोरोले व मनिष गंगाधर अमृतकर या दोघांना जबाबदार धरत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी फैलावर घेतले असून तीन दिवसात लेखी खुलासा सादर करावा अशी नोटीस बजावली आहे.महानगरपालिकेत काही अधिकारी व कर्मचारी प्रशासनाशी प्रामाणित न राहता विशिष्ट यंत्रणेसाठीच काम करीत असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. यापूर्वी देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीसंदर्भाचे पत्र दडवून ठेवण्यात आल्याचा आरोप तत्कालीन महापौर जयश्री महाजन यांनी प्रशासनावर केला होता. अभियंत्यांच्या बदल्यांच्यावेळी देखील काही जणांनी दबावतंत्राचा वापर केल्याचे समोर आले होते. दोन दिवसापूर्वी आयुक्तांनी प्रभाग क्र. ३ मध्ये  सुरु असलेल्या काँक्रीट रस्ते, गटार  व स्लॅब कल्व्हर्ट बांधकामाची पाहणी केली असता हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे उघड झाले होते. या कामावर नियंत्रणाची जबाबदारी असलेले कनिष्ठ अभियंता मनिष अमृतकर यांनी त्याकडे डोळेझाक केल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव