शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

त्यामुळेच मी राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो- जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 22:14 IST

विद्यापीठाच्या युवारंग युवक महोत्सवाचे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

भूषण श्रीखंडे, जळगाव: मी महाविद्यालयात असतांना अनेक नाटकं या रंग मंचावर सादर केली, आणि त्यातूनच मी घडत जाऊन राजकारणात वेगळा ठसा उमटवू शकलो. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर घडविण्यासाठी युवक महोत्सवाचा निश्चितच फायदा होणार असून विद्यार्थी कलावंतांनी या महोत्सवात आपले अंगभूत कलागुण दाखवावे या असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. पुढे बोलतांना पालकमंत्री पाटील म्हणाले, की तुम्ही किती शिकला यापेक्षा तुमची मांडणी कशी आहे. हे आज महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे कला सादर करतांना उत्तम करा. यातून उद्याचे कलावंत घडणार आहेत. जे राज्यात आपला स्वतंत्र ठसा उमटवतील. या महोत्सवात मुलींचा सहभाग वाढल्याबद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. तर मंचावर संस्था अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, आमदार सुरेश भोळे, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, सहसंचालक प्रा.संतोष चव्हाण, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.शिवाजी पाटील, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा सुरेखा पालवे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, ॲड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य एस. एन. भारंबे, राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल राव, भरत अमळकर, प्र अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत, प्राचार्य ए. पी. खैरनार, प्राचार्य अशोक राणे, ॲड. प्रमोद पाटील, भालचंद्र पाटील, डॉ. हर्षवर्धन जावळे, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, रुपेश चिरमाडे, संजय प्रभूदेसाई, सीए रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील, डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ. मनोज महाजन उपस्थिती होते.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटील