शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

बोदवडजवळ प्रेमप्रकरणातून तृतियपंथीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:46 IST

पत्नी व मुलांना सोडून सोबत रहा, अन्यथा घरी व नातेवाईकांना सांगून बदनामीची धमकी देणाºया चंदा उर्फ कैलास (मुळ रा.नशिराबाद, ह.मु.अडावद, ता.चोपडा) या तृतियपंथीचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता बोदवड तालुक्यातील नाडगाव शिवारातील उजनी दर्गाजवळ घडली.

ठळक मुद्दे चौघांना अटक नागरिकांनीच पकडून दिले संशयितांनाजंगलात केला चाकूने खून

जळगाव : पत्नी व मुलांना सोडून सोबत रहा, अन्यथा घरी व नातेवाईकांना सांगून बदनामीची धमकी देणा-या चंदा उर्फ कैलास (मुळ रा. नशिराबाद, ह.मु.अडावद, ता.चोपडा) या तृतियपंथीचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता बोदवड तालुक्यातील नाडगाव शिवारातील उजनी दर्गाजवळ घडली.याप्रकरणी चंदाचा प्रियकर संदीप कैलास साळुंके (३०), त्याचा साथीदार राहूल विष्णू ठाकरे (३२), आकाश जयंत सोनवणे (२०) व अतुल हिरालाल धनगर (२२) सर्व रा.कमळगाव, ता.चोपडा या चौघांना लोकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चौघांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप साळुंके व तृतियपंथी चंदा यांच्यात तीन वर्षापासून प्रेमप्रकरण होते. संदीप याने पत्नी व मुलांना सोडून आपल्यासोबत रहावे म्हणून चंदाचा आग्रह होता, मात्र ते शक्य नसल्याने चंदाकडून घरी कुटुंबात व नातेवाईकात सांगून बदनामी करण्याची धमकी दिली जात होती. आपले बींग फुटू नये म्हणून संदीप याने रविवारी चंदाला उजनी दर्ग्याच्या दर्शनासाठी जायचे आहे असे सांगून मित्राच्या चारचाकीतून (क्र.एम.एच.१९ बी.जे.९५४२) राहूल, आकाश तसेच अतुल यांना सोबत घेऊन उजनी दर्गा ते सोनोटी रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ नेऊन चाकूने भोसकून खून केला.मारु नकाचा आवाज ऐकला अन् चौघे फसले चंदावर चाकूने वार होत असताना मला मारु नका...असा जोराचा आवाज शेजारी लघुशंका करीत असलेल्या किशोर अशोक अवचारे (रा.सोनोटी, ता.बोदवड) या ट्रक्टर चालकाला आला. काय प्रकार आहे यासाठी पुढे जावून बघण्याचा प्रयत्न करीत असताना रक्ताने भरलेल्या अवस्थेत चौघं जण पळताना दिसले. एकाच्या हातात चाकू होता. अवचारे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता तु तुझे काम कर..असे म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना शेजारी बक-या चारणा-या तरुणांच्या मदतीने चौघांना पकडण्यात आले. त्यानंतर जेथे आवाज येत होता तेथे त्यांना नेले असता साडी परिधान केलेली महिला मृतावस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात दिसली.चौघांना केली अटकदरम्यान, घटनेच्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार शरद भालेराव, दीपक पाटील, विनोद पाटील व अरुण पाटील यांचे पथक निंबोल दरोड्याच्या तपासासाठी जात असताना हा प्रकार त्यांना समजला. बोदवडचे निरीक्षक खरे,सहायक फौजदार विजेश पाटील, संजय भोसले व इतरांनी गावक-यांच्या ताब्यातून आरोपींना घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव