जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपणास युतीच्या प्रचाराला बोलावले आहे, पक्षात नाही. आमची युती असल्यामुळे युतीचा प्रचार करणार असल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.शनिवारी जळगाव महापालिकेच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात रंगलेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी गिरीश महाजन यांना आमच्याकडे द्या, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती.यामुळे ठाकरे यांनी टाकलेल्या गुगलीची एकच चर्चा रंगली होती. याबाबत छेडले असता गिरीश महाजन यांनी वरील वक्तव्य केले.मूळ विषयाला दिली बगलठाकरे यांनी बोलावले असल्याने आपण शिवसेनेत जाणार काय? यावर जोरदार हसून त्यांनी बोलणे टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, युती झाली असल्याने, निवडणुका जिंकण्यासाठी प्रचाराला जाणार असल्याचे सांगत मूळ विषयाला बगल दिली.यावेळी महापौर, आमदारांसह अनेक नगरसेवक उपस्थित होते.
ठाकरे यांनी प्रचाराला बोलवले, पक्षात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:47 IST
- गिरीश महाजन
ठाकरे यांनी प्रचाराला बोलवले, पक्षात नाही
ठळक मुद्देयुती असल्यामुळे प्रचार करणारच