शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मित्राच्याच एटीएमचे बनविले बनावट एटीएम कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:51 IST

आॅनलाइन फसवणुकीच्या प्रकरणातील निशांत तेजकुमार कोल्हे (रा़ कोल्हेनगर) या अटक केलेल्या संशयितावर गुरूवारी रात्री आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणात निशांतने त्याच्याच मित्राचे एटीएमकार्ड वापरण्यासाठी घेवून त्याचे बनावट एसटीम (क्लोन) तयार करून गैरव्यवहार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

ठळक मुद्देनिशांत विरूध्द आणखी एका गुन्हा दाखल२०० के्रडीट कार्डची महितीनिशांत याने बीट कॉईनची केली विक्री

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ : आॅनलाइन फसवणुकीच्या प्रकरणातील निशांत तेजकुमार कोल्हे (रा़ कोल्हेनगर) या अटक केलेल्या संशयितावर गुरूवारी रात्री आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. याप्रकरणात निशांतने त्याच्याच मित्राचे एटीएमकार्ड वापरण्यासाठी घेवून त्याचे बनावट एसटीम (क्लोन) तयार करून गैरव्यवहार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.औरंगाबाद येथील बजाज फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक जयरुद्दीन बदरुद्दीन शेख (रा. त्रिवेणीनगर) यांनी १८ मे रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून निशांत याच्याविरूध्द आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हाच्या चौकशी दरम्यान निशांत यास अटक केल्यानंतर त्याने मोठ्या फायनांन्स कंपन्यांना कोट्यांवधींचा चुना लावल्याचे उघड झाले होते़ त्यातच गुरूवारी रात्री संशयीत निशांतवर आयटी अ‍ॅक्ट ६६ सी प्रमाणे दिग्वीजय गजानन चत्रे (वय १७) यांच्या फियार्दीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यामध्ये दिगवीजय याचे एसबीआय बँकेचे एटीएम डेबीट कार्ड निशांत याने वापरण्यसाठी डिसेंबर २०१७ ते २३ मे २०१८ दरम्यान घेतले होते. या दरम्यानात निशांतने या कार्डचे क्लोन (बनावट) तयार करून गैरव्यवहारासाठी वापर केला.तुटलेले कार्ड केले परतबनावट एटीएमकार्ड तयार केल्यानंतर निशांत याने दिगवीजय याला तुटलेले कार्ड दिले. तर त्यानंतर एटीएमचे क्लोन कार्डद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले़ अखेर गुरूवारी रात्री दिग्विजय याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात येऊन निशांत याच्याविरूध्द फिर्याद दाखल केली आहे़आॅनलाईन पध्दतीने ट्रेडमिल सायकल ईएमआय कार्ड प्रणालीद्वारे फिटनेस वन इंडिया कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील निशांत तेजकुमार कोल्हे याला शुक्रवारी न्यायाधीश घोरपडे यांच्या न्यायालयात हजर केले असता २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़तपासात संशयित निशांत याच्याकडे पेटीएमची फेक की मिळून आली आहे. तसेच त्यांने बिट कॉईन मिनींगचे मशिन एस-७ हे बीट माईन डॉट कॉमवरून खरेदी केले आहे. ते मशिन त्याने सुधीर शिंदे उर्फ साई पांचाळ रा. परभणी याला विकले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची देखील चौकशी केली आहे.तपासात त्याच्याजवळ जवळपास २०० क्रेडीट कार्डचे डिटेल आहे. हे कार्ड कोणाचे व कुठून आणले आहे. याची पोलिस चौकशी करीत आहे. त्याच्याकडून एक संगणक संच, विविध कंपन्याचे सीमकार्ड, बॅकांचे शॉपींग व डेबीट कार्ड तसेच वायफाय मशिन व मॅग्नेटीक स्ट्रीप कार्ड रिडर राईटर मशिन देखील मिळून आले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा