जळगाव : आव्हाणे शिवार येथील श्री समर्थ प्राथमिक माध्यमिक विद्यालयात शासनाच्या सर्व शिक्षा अभियानअंतर्गत समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, वैशाली शिंदे, जयश्री पाटील, चैताली पाटील, मोहिनी सुरवाडे, दीपमाला बाविस्कर, जयश्री सपकाळे, दिशा पाटील, राहुल पाटील, सद्दाम तडवी, पवन पाटील, विपुल पाटील, संदीप मोरे, प्रसन्न कोळी आदी उपस्थित होते.
प्रभाग समिती १ कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड
जळगाव : मनपात मालमत्ता कराची रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रभाग समिती १ मधील कर्मचाऱ्यांना तत्काळ ओळखता यावे, यासाठी मनपा प्रशासाने प्रभाग समिती १ च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना ड्रेसकोड निश्चित करून दिला आहे. यासह मनपातील विविध प्रभाग समित्यांमधील कर्मचाऱ्यांनादेखील नवा ड्रेसकोड निश्चित करून दिला जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.