शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘वाळू डेपों’साठी सोमवारपासून निविदांची प्रक्रिया, वाळू आरक्षित करण्यासाठी होणार कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 16:32 IST

५ शासकीय कामांना देणार प्राधान्य

कुंदन पाटील, जळगाव: हतनूर धरणातील आघ वक्राकार दरवाज्यांसह पाच महत्त्वकांक्षी विकास प्रकल्पांसाठी वाळू गट आरक्षित करावे लागणार आहेत. त्यानंतरच खासगी कामांसाठी वाळू पुरविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सरकारी आणि खासगी कामांसाठी वाळू उपलब्ध करण्यासाठी नियंत्रण समितीची कसरत होणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, वाळू डेपोंसाठी सोमवारपासून ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

नव्या वाळू धोरणानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात २७ डेपोंसाठी जागेची निश्चीत केली आहे. २७ डेपोंची निश्चीती केली असताना पर्यावरण समितीने केवळ आठच घाटांवरुन वाळू उचल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात केऱ्हाळे, पातोंडी, दोधे (रावेर), तांदळी (अमळनेर), भोकर (जळगाव),  धावडे, बाभुळगाव १ आणि २ अशा वाळू घाटांचा समावेश आहे. उपलब्ध साठ्यातून शासकीय प्रकल्पांना वाळू पुरविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.त्यात हतनूर धरणावरच्या आठ वक्राकार दरवाजे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भोकर पूल, निम्न तापी प्रकल्प, महाजनको प्रकल्प या पाच कामांसाठी वाळू आरक्षित करावी लागणार आहे. त्यामुळे मंजूर असलेल्या आठ पैकी ३ ते ४ वाळू घाट या कामांसाठी आरक्षित ठेवण्याची शक्यता आहे. उर्वरीत ४ ते ५ घाटांवरुन उचल झालेली वाळू खासगी कामांसाठी पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे हा साठा खासगी कामांना कितपत पुरेल, याविषयी शंकाच आहे. त्यामुळे वाळू नियंत्रण समितीकरवी सुवर्णमध्ये साधला जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर काही पर्यायदेखिल निश्चीत केले आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव