शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आडगावातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी विकल्या दहा बैलजोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:05 IST

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून चारा पाण्याअभावी गावातील शेतकºयांनी दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देबैलजोड्यांची विक्री करतांना शेतकºयांच्या जिवाची झाली घालमेलअनेक शेतकरी पशुधन विकण्याच्या मनस्थितीत

आडगाव ता.चाळीसगाव : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरूवातीपासूनच दगा दिल्याने परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:च्याच जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पशुंना जगवायचे कसे याचा पेच पडला आहे. त्यामुळे गुरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात असून आडगाव येथील शेतकºयांनी एकाच दिवशी तब्बल दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे. अजून काही शेतकरी बैल जोडी व इतर गुरे विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. जिवाच्या मैतराला विकतांना शेतकºयांच्या जीवाचे अक्षरश: पाणी पाणी झाले होते.आडगांवसह संपूर्ण मन्याड परिसरात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस गडद होत चालल्याने पिके तर वाया गेलीच आहेत, आता तर मुक्या जनावरांना जगवायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. आडगांवसह परीसरातील बहुतेक गावांतील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बैलजोडी, शेळ्या पाळतो. शेतात मुबलक पाणी व चारा उपलब्ध राहत असल्याने गुरे पाळणे सोयीस्कर होते. परंतु गेल्या दोन/तीन वर्षापासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेल्याने चारा व पाण्याचा प्रश्न गहन होत गेला आहे. थोड्या फार पाण्यावर चारा वगैरे टाकून आतापर्यंत शेतकºयांनी काटकसरीने पूरविले. या वर्षी खरीपात टाकलेला चारा व गवत पाण्याअभावी जळून गेल्याने या शिवाय परीसरात हीच परिस्थिती राहील्याने आतापासूनच चारा कुठून विकत आणावा ? महागडा चारा किती गुरांना पूरवावा, याचा ताळमेळ बसत नसल्याने मोठ्या हताश मनाने शेतकºयांनी मुक्या जनावरांना पाणी व चाºयाअभावी अर्धपोटी राहू देण्यापेक्षा त्यांना विकलेले बरे असा निर्णय घेत एकाच दिवशी दहा बैलजोड्या विकल्या. अजूनही काही शेतकरी पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. तर काही जण साखर कारखान्यांचा हंगाम संपेपर्यंत चारा पाणीसाठी मुकादमाच्या हवाली करणार आहेत. वर्षभर शेतात राबणाºया सर्जा- राजाला विकतांना किंवा साखर कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करण्यासाठी मुकादमाच्या हवाली करतांना शेतकºयाच्या जिवाची घालमेल होत आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळ